IAS Transfer : मुंबई महापालिका आयुक्त चहल यांच्यानंतर अतिरिक्त आयुक्त भिडेंचीही बदली

Election Commission and Maharashtra : मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नियुक्ती
Ashwini Bhide
Ashwini BhideSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य सरकारने विनंती करूनही मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची थेट निवडणूक आयोगाने तडकाफडकी बदली केली. त्यानंतर राज्य सरकारला आयोगाच्या आदेशानुसार नाईलाजास्तव का होईना अखेर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचीही बदली करावी लागली. IAS Transfer

राज्य सरकारने अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लागली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपूर्वी भिडे याच पदावर होत्या. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने भिडेंची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashwini Bhide
IAS Transfer : ठाण्याची सुभेदारी सांभाळण्यासाठी आणलेल्या बांगरांची तडकाफडकी बदली; आयोगाचा CM शिंदेना धक्का

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्वजिल्ह्याती आणि तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे निर्देश दिले होते. यावर राज्य सरकारने 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला या बदल्यांबाबतच्या निकषातून मुंबई पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना वगळण्याची विनंती केली होती. मात्र, ती विनंती फेटाळत आयोगाने चहलांची सोमवारी तडकाफडकी उचलबांगली केली.

चहल यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली होणार हे निश्चित झाले होते. आता त्यांची वर्णी कुठे लागणार याकडे लक्ष होते. आयोगाने चहलांची बदली केल्यानंतर मंगळवारी राज्य शासनाने आदेश काढून भिडेंची पुन्हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. तर त्यांचा चार्ज अमित सैनी यांच्याकडे दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashwini Bhide
Iqbal Singh Chahal Transfer : ठाकरेंनी आणलेल्या, शिंदेंनी गोंजारलेल्या चहलांना थेट इलेक्शन कमिशनचा दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com