Congress : काँग्रेसला मोठा धक्का बसणार; आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर ?

Congress Kamal Nath: आणखी एक माजी मुख्यमंत्री लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News: लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे 'एनडीए'च्या नेत्यांच्या बैठकीचा धडाका सुरू आहे, तर दुसरीकडे 'इंडिया' आघाडीनेही जोरदार रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असे असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress News
Delhi Trust Vote : बिहार, झारखंडनंतर आता दिल्ली सरकारलाही बहुमत सिद्ध करावं लागणार...

कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्सवरून काँग्रेसचे नाव काढले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच कमलनाथ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आज कमलनाथ यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. तसेच कमलनाथ हे त्यांचे पुत्र नकुलनाथ यांच्यासह दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे. कमलनाथ यांच्याबरोबर तब्बल दहा आमदारदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या सर्व घाडामोडींवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तर कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त काँग्रेसकडून फेटाळण्यात आले आहे.

काँग्रेसचे नाव एक्स प्रोफाइलवरून हटवले ?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. यातच कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पक्षाचे नाव आपल्या एक्स (ट्विटर) प्रोफाइलवरून हटवले आहे. तसेच नकुलनाथ यांनी आपले सर्व दौरे अचानक रद्द केले असून, ते दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Edited By-Ganesh Thombare

R

Congress News
BJP National Convention : भाजपच्या 'हॅटट्रिक'साठी दिल्लीत 'ब्रेनवाॅश'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com