New Delhi News : बिहार आणि झारखंडनंतर आता दिल्ली सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच आज विश्वासदर्शक ठराव मांडला. या वेळी त्यांनी भाजपवर आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. यावर आता शनिवारी चर्चा होणार आहे. (Delhi Trust Vote)
केजरीवालांनी (Arvind Kejriwal) पहिल्यांदा ऑगस्ट 2022 आणि त्यानंतर मार्च 2023 मध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला होता. आज सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी हा ठराव मांडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी आपच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजपने (BJP) केल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी केजरीवालांना नोटीस पाठवून याबाबत पुरावे मागितले होते.
या घडामोडींनंतर केजरीवालांनी आज विधानसभेत (Assembly) मोठा गौप्यस्फोट केला. विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी दोन आमदार वेगवेगळ्या दिवशी माझ्याकडे आले आणि भाजपने संपर्क केल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांना अटक केली जाईल. आम्ही 21 आमदारांशी चर्चा केली आहे. प्रत्येकी 25 कोटी देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाईल, असे या आमदारांनी सांगितल्याचा दावा केजरीवालांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने ऑपरेशन लोटस अनेकदा केले आहे, पण ते फसले असून यावेळीही सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. 21 आमदारांनीही भाजपला नकार दिल्याचे केजरीवालांनी सांगितले. कथित मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी केजरीवालांना पाचवे समन्स पाठवले आहे. याच प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह तुरुंगात आहेत.
यावर केजरीवाल म्हणाले, कथित मद्य घोटाळा कसलाही घोटाळा नाही. खोटी केस करून केवळ सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीत ते आयुष्यभर निवडणूक जिंकू शकत नाहीत. आमचा एकही आमदार फुटला नाही, असे सांगत केजरीवालांनी विश्वासदर्शक ठराव मांडला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.