Congress News : कमलनाथ गाशा गुंडाळणार? मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून होणार उचलबांगडी?

Madhya Pradesh Election Congress High Command On Kamal Nath : विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस हायकमांडे अॅक्शन मोडवर...
Kamal Nath
Kamal Nath Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh assembly election results 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. कमलनाथ यांना काँग्रेस हायकमांडने काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. कमलनाथ हे दीर्घकाळापासून मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. याशिवास ते विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने 163 जागांवर विजय मिळवला. तर 66 जागा मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. निवडणुकीत भाजपला 57 जागांचा लाभ झाला.

Kamal Nath
India Alliance : 'इंडिया' आघाडीत फूट? ममता, नितीश कुमार, अखिलेश यांची बैठकीला दांडी; शरद पवार जाणार का?

कमलनाथ यांची रणनीती अपयशी

भाजपच्या हिंदू विरोधी आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी कमलनाथ यांनी साधूंची भेट घेतली. यासोबतच देवदेवतांच्या मूर्ती बनवल्या. निवडणुकीपूर्वी धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले. यामुळे मुस्लिमांसह मागास समाजातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. हा धार्मिक भेदभाव असल्याचे म्हटले. कमलनाथ यांचा सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग निवडणुकीत अपयशी ठरला.

काँग्रेस पराभवाच्या कारणांवर चर्चा करणार

ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, सुरेश पचौरी आणि इतर प्रमुख नेते पक्षाच्या पराभवाची चर्चा करणार आहेत. यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या मीडिया सेलच्या प्रमुखांनी बैठकीबाबत दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या 230 उमेदवारांची बैठक काँग्रेसने आज बोलावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसवर मित्रपक्षांनी उपस्थित केले सवाल

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला. यामुळे काँग्रेस समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशात काँग्रेसची आता कर्नाटक, हिमाचल आणि तेलंगणमध्ये सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी 2024 काँग्रेससाठी ही धोक्याची घटना घंटा आहे. विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची चौथी बैठक उद्या दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अखिलेश यादव हे या बैठकीला येणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

Kamal Nath
Rajasthan Politics : वसुंधराराजे अन् गेहलोत यांचे बुरुज ढासळले; 'होम पिच'वर ओढवली नामुष्की...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com