India Alliance Latest News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या 6 डिसेंबरला दिल्लीत INDIA आघाडीची बैठक बोलावली आहे. पण ही बैठक होण्यापूर्वीच आघाडीच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. पण या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या उपस्थित राहणार नाहीत. यासोबतच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही बैठकीला जाणार नसल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमारही या बैठकीला जाणार नसल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच INDIA आघाडीत एकजूट नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तीन प्रमुख पक्षांचे नेते आणि दोन मुख्यमंत्री बैठकीला येणार नाहीत. दुसरीकडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठकीसाठी दिल्लीत उद्या दाखल होणार आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक INDIA आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी INDIA ही बैठक बोलावली होती. पण या बैठकीला आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. पण संयुक्त जनता दलाकडून लल्लन सिंह आणि संजय झा हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार हे प्रमुख नेते बैठकीला येणार नसल्याने बैठकीच्या बाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे बैठकीसाठी उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत, अशी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीला जाणार का? याकडे लक्ष आहे.
बैठकीची माहितीच नाही- ममता बॅनर्जी
बैठकीबाबत आपल्याला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. कुठला फोनही आला नाही. उत्तर बंगालमध्ये आपला 6 ते 7 दिवसांचा दौरा आहे. विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आपल्याला आता बोलवले तरी बैठकीला जाणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासह निवडणुकीत आघाडीन न केल्याने काँग्रेसला पराभावाचा सामाना करावा लागला, अशी टीकाही केली आहे. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. समाजवादी पक्षाने 70 जागांवर उमेदवार उतरवले होते. पण कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाशी आघाडी करण्यास नकार दिला होता. यामुळे अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखिलेश यादव यांच्या पक्षामुळे अनेक जागांवर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
नितीश कुमार यांना चेहरा बनवण्याची मागणी
तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांना INDIA आघाडीचा चेहरा बनवण्याची मागणी केली आहे. निवडणुकीत काँग्रेस व्यग्र असल्याने INDIA आघाडीकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी टीका संयुक्त जनता दलाचे नेते निखिल मंडल यांनी केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.