आमच्याकडे 700 आमदार...! टीका होताच काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दाखवली ताकद

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच इतर पक्षांतील नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसची विश्वासार्हता संपली असून त्यांच्यावर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही, असा सणसणीत टोला लगावला आहे.

ममतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) हे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. चौधरी यांनी ममतांना भाजपचे (BJP) एजंट म्हणत निशाणा साधला. संपूर्ण भारतातील काँग्रेसच्या स्थितीविषयी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसजवळ विरोधकांच्या एकूण मतदानाच्या 20 टक्के हिस्सा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे संपूर्ण भारतात 700 आमदार आहेत. दीदींजवळ एवढे आमदार आहेत का, असा सवाल करत चौधरी यांनी ममतांच्या टीकेला उत्तर दिलं.

Congress
मुकुल वासनिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी? 23 ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलं होतं नाव

ममता बॅनर्जी या भाजपला खूश करण्यासाठी, त्यांच्यासोबत एजंट बनून काम करण्यासाठी असं म्हणत आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यातील काँग्रेसला हरवण्यासाठी गेली होती. आता त्याच काँग्रेसला विरोधी आघाडीतून दुर करण्यासाठी अपप्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न बघत आहेत आणि दीदी काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडीची गोष्ट करत आहेत, अशी टीका चौधरी यांनी केली.

काँग्रेसच्या बैठकीआधी अध्यक्षपदावरून चर्चा

मागील काही वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्षांशिवाय राजकारणात पुन्हा जम बसवू पाहणाऱ्या काँग्रेसला पाच राज्यांतील निवडणुकांमधील पराभवाने मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) या सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असल्यातरी पडद्यामागून राहुल गांधीच निर्णय घेत असल्याचा दावा नाराज गटातील नेत्यांकडून केला जातो. जी 23 या नाराज गटानं अध्यक्षपदासाठी सरचिटणीस मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते, असे समोर आलं आहे.

Congress
गिरीश महाजनांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

पाच राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी (ता. 13) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये निवडणुकांमधील पराभव व आगामी अधिवेशानातील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर पुन्हा अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. त्यातच मुकूल वासनिक यांचं नाव अचानक समोर आलं आहे.

काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी 23 (G 23) या गटाने अध्यक्षपदासाठी वासनिक यांचं नाव सुचवलं होतं, अशी माहिती सुत्रांनी दिली. पण हे नाव स्वीकारण्यात आलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या गटामध्ये आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद व इतर मुद्दांवरून पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com