AAP Vs Congress In Punjab : पंजाबमध्ये 'आप'चे 30 आमदार पक्ष सोडणार? ; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ!

Arvind Kejriwal Meeting with Punjab MLAs: अरविंद केजरीवालांनी दिल्लीत घेतली मंत्री अन् आमदारांची तातडीची बैठक; जाणू घ्या काय सुरू आहे गोंधळ?
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Punjab News: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारूण पराभव झाल्यानंतर आता पंजाबमध्येही राजकीय हालाचालींना वेग आला आहे. पंजाब काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी दावा केला आहे की, आम आदमी पार्टीचे 30 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खबळबळ उडाली आहे.

याचदरम्यान आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तातडीने पंजाबमधील सर्व मंत्री व आमदारांना दिल्लीत बोलावून घेत, मंगळवारी कपूरथलामध्ये एक मिटींगही घेतली आहे. विशेष म्हणजे या तातडीच्या मिटींगमुळे पंजाबमध्ये आज होणारी कॅबिनेट बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे.

Arvind Kejriwal
TMC and Congress News : दिल्लीनंतर आता काँग्रेसला पश्चिम बंगालमध्येही झटका; ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय!

पंजाबमध्ये 2022मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने(AAP) 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 18, भाजपने दोन, शिरोमणी अकाली दलाने तीन आणि भाजपने एका जागेवर विजय मिळवला होता. पंजाबमध्ये बहुमताचा आकडा 59 आहे. अशावेळी जर आम आदमी पार्टीचे 30 आमदारांनी जरी पक्षाची साथ सोडली तरी पक्षाकडे 62 आमदार राहतील आणि यामुळे सरकारला तसे कोणतेही संकट नसेल.

काँग्रेस खासदार धर्मवीर गांधी यांनी म्हटले की, पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये केंद्रीय नेतृत्वाबाबत आक्रोश आहे आणि ते पंजाबच्या संसाधनांवर कब्जा करत आहेत. तर भाजप(BJP) नेते सुशील रिंकू यांनी म्हटले की, ही मिटींग सिद्ध करते की पंजाबचे सरकार आता दिल्लीतून चालवले जाईल आणि आगामी काळात आम आदमी पार्टीचे आमदार विद्रोह करू शकतात.

Arvind Kejriwal
Sukesh Chandrasekhar letter to Kejriwal : सुकेश चंद्रशेखरने 'तिहार'मधून केजरीवालांना पाठवले पत्र अन् दिल्ली निवडणुकीचा उल्लेख करत, म्हणाला...

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने अनेक प्रलोभवनप्रमाणे आश्वासनं दिली होती. जसं की ५० हजार सरकारी नोकऱ्या, ३०० युनिट मोफत वीज आणि 850 मोहल्ला क्लिनिक. परंतु ही आश्वासनं पूर्ण केली गेली नाहीत. ज्याचा आम आदमी पार्टीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. आता दिल्लीतही सरकार गेल्याने आम आदमी पार्टीसाठी पंजाब महत्त्वाचे बनले आहे, कारण एकमेव पंजाबमध्येच 'आप' सत्तेत आहे.

खरंतर AAPची सत्ता जाण्याचा धोका 2024मध्येच जाणवू लागला होता. जेव्हा दिल्लीत लोकसभेची एकही जागा पक्षाला जिंकता आली नाही आणि पंजाबमध्ये देखील केवळ तीन जागा ते जिंकू शकले. आता पक्ष पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीस लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केजरीवलांनी आमदारांना कानमंत्र देण्यास दिल्लीला बोलावल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com