TMC and Congress News : दिल्लीनंतर आता काँग्रेसला पश्चिम बंगालमध्येही झटका; ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय!

Mamta Banerjee and Congress : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेचा अतिशय मानहानीकारक पराभव झाल्यानंतर, आता इंडी आघाडीतील अन्य घटक पक्षही काँग्रेसची हळूहळू साथ सोडताना दिसत आहेत.
Mamta Banerjee and Congress
Mamta Banerjee on CongressSarkarnama
Published on
Updated on

TMC on West Bengal Assembly Election : काँग्रेस पक्ष अद्याप दिल्ली विधानसभेतील मानहानीकारकर पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. तोच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कारण, इंडी आघाडीमधील त्यांचा सहकारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसनेही पश्चिम बंगाल विधानसभा निडणूक स्वबळावरच लढण्याची घोषणा केली आहे आणि काँग्रेससोबत युतीसाठी नकार दर्शवला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या(TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2026ची निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आगामी विधानसभेत काँग्रेस अथवा अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याबाबतच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

त्यामुळे आता इंडी आघाडीतील एक एक घटक पक्ष काँग्रेसची(Congress) साथ सोडत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी काँग्रेसला आता स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. कारण, दिल्ली विधानसभा निवडणुकीतही इंडीया आघाडीतील अन्य पक्ष हे काँग्रेसच्या नव्हे तर आम आदमी पार्टीच्या बाजूने राहिल्याचे दिसून आले. अशावेळी काँग्रेस मात्र आता एकाकी पडत असल्याचे जाणवत आहे.

Mamta Banerjee and Congress
Congress News: काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट; पक्षश्रेष्ठी घेणार मोठा निर्णय

दुसरीकडे टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनी विधानसभेच्या बजट सत्राआधी आयोजित एका बैठकीत आपल्या पक्षाच्या खासदारांना संबोधित करताना पुढील वर्षात होणारी विधानसभा निवडणूक दोन तृतीयांश बहुमताने जिंकण्याचाही विश्वास दर्शवला. त्यांनी दावा केला की टीएमसी सलग चौथ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवेल. यासाठी ममता बॅनर्जींनी(Mamta Banerjee) पक्षाच्या आमदारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. एवढच नाहीतर ममता बॅनर्जींना असाही आरोप केला आहे की, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा मतदारयादीत परदेशी लोकांची नावं समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते.

Mamta Banerjee and Congress
Prashant Kishor on Arvind Kejriwal : 'AAP'च्या पराभवानंतर 'PK' यांनी केजरीवालांची मोठी चूकही सांगितली अन् सल्लाही दिला!

प्राप्त माहितीनुसार ममता बॅनर्जींनी म्हटले की, काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पार्टीची मदत केली नाही. हरियाणात आम आदमी पार्टीने काँग्रेसची मदत नाही केली. यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय झाला. सर्वांनी एकजुटीने रहायला हवं. परंतु पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचं काहीच नाही. मी एकटीच लढेन. आपण एकटेच पुरेसे आहोत. टीएमसीच्या सूत्रांच्या हवाल्याने एका बंद खोलीत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जींनी म्हटले की, समानविचारधारा असणाऱ्या पक्षांना आपसातील सामंजस्य कायम राखावे लागेल, जेणेकरून भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार नाही. अन्यथा इंडी आघाडीला राष्ट्रीय पातळीवर भाजपला रोखणं अवघड होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com