भोपाळींना समलैंगिक म्हणणाऱ्या अग्निहोत्रींना दिग्विजयसिंह म्हणाले, बहुदा तुमचा...

'द काश्मीर फाईल्स'चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
Vivek Agnihotri and Digvijay Singh
Vivek Agnihotri and Digvijay SinghSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आहेत. आता त्यांनी वादग्रस्त विधान करुन नवा ओढवून घेतला आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह (Digvijay Singh) यांनी उत्तर दिले आहे. (Vivek Agnihotri News)

काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांना देशभरासाठी मोदी सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. आता त्यांना नव्या वादाला तोंड फोडले आहे. याला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह म्हणाले की, विवेक अग्निहोत्री बहुदा हा तुमचा वैयक्तिक अनुभव असेल. भोपाळमधील सामान्य नागरिकांचा हा अनुभव नाही. भोपाळ आणि भोपाळी नागरिकांच्या संपर्कात मी 1977 पासून आहे. मात्र, आतापर्यंत मला असा एकही अनुभव आलेला नाही. तुम्ही कुठेही राहा, शेवटी संगतीचा परिणाम होत असतो.

Vivek Agnihotri and Digvijay Singh
भोपाळी म्हणजे समलैंगिक! काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाचं वादग्रस्त विधान

काय म्हणाले होते विवेक अग्निहोत्री?

विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीतच भोपाळी म्हणजे समलैंगिक असे वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर विवेक अग्निहोत्रींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, मी भोपाळमध्ये वाढलो आहे पण भोपाळी नाही. कारण भोपाळी या शब्दाला वेगळे अर्थ आहेत. हा अर्थ मी तुम्हाला खासगीत सांगू शकतो अथवा तुम्ही एखाद्या भोपाळीला विचारा. तुम्हाला एखाद्याला भोपाळी म्हटले तर याचा अर्थ तो समलैगिक अथवा नवाबी पद्धतीचा आहे, असा होतो.

Vivek Agnihotri and Digvijay Singh
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं समर्थन करून गडकरींनीच सांगितलं वाढीचं कारण...

निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. असे असताना बिहारचे माजी मुख्यमंत्री जीनतराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल अनेक गंभीर आरोप केले होते. हा चित्रपट दहशतवाद्यांचा कट असून, याच्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप (BJP) आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) हा पक्षही सहभागी आहे. त्यांनी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या काश्मीर फाईल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे बिहार सरकारमधील बिघाडी समोर आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com