भोपाळी म्हणजे समलैंगिक! काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाचं वादग्रस्त विधान

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे.
Vivek Agnihotri, Anupam Kher and Pallavi Joshi
Vivek Agnihotri, Anupam Kher and Pallavi Joshi Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आहेत. त्यांना मोदी सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे. आता त्यांनी वादग्रस्त विधान करुन नवा ओढवून घेतला आहे. (Vivek Agnihotri News)

काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे त्यांना देशभरासाठी मोदी सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. आता त्यांना नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी एका मुलाखतीतच भोपाळी म्हणजे समलैंगिक असे वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर विवेक अग्निहोत्रींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, मी भोपाळमध्ये वाढलो आहे पण भोपाळी नाही. कारण भोपाळी या शब्दाला वेगळे अर्थ आहेत. मी तुम्हाला खासगीत सांगू शकतो अथवा तुम्ही एखाद्या भोपाळीला विचारा. तुम्हाला एखाद्याला भोपाळी म्हटले तर याचा अर्थ तो समलैगिक अथवा नवाबी पद्धतीचा आहे, असा होतो.

Vivek Agnihotri, Anupam Kher and Pallavi Joshi
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं समर्थन करून गडकरींनीच सांगितलं वाढीचं कारण...

निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप

दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीनतराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल अनेक गंभीर आरोप केले होते. हा चित्रपट दहशतवाद्यांचा कट असून, याच्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) हा पक्षही सहभागी आहे. त्यांनी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या काश्मीर फाईल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे बिहार सरकारमधील बिघाडी समोर आली.

Vivek Agnihotri, Anupam Kher and Pallavi Joshi
विधानसभा अध्यक्षपदाचा मान भाजपला! राज्याच्या इतिहासात प्रथमच महिलेला संधी

मोदींकडून चित्रपट अन् दिग्दर्शकाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे (BJP) नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे जाहीर कौतुक केले होते. काश्मीर पंडितांवरील अत्याचार दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, असे मोदी म्हणाले होते. याचबरोबर मोदींनी अग्निहोत्री हे निडर असल्याची प्रशंसाही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com