नवी दिल्ली : कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad)यांनी कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीबाबत विरोधकांचा सामना कसा करायचा, याबाबत यावेळी चर्चा झाली.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुका, पक्षसंघटना तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
आझाद यांच्या निवासस्थानी बंडखोर नेत्यांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर गुरुवारी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासोबत बैठक घेतली होती. या आठवड्यात सोनिया यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी दोन वेळा फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर आझाद यांनी शनिवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली.
''पाच राज्यांमध्ये कॉग्रेसचा झालेला पराभव याबाबत कॉग्रेसच्या कार्यकारिणीने काही सूचना मागवल्या होत्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीने लढून विरोधकांना पराभूत करण्यावर चर्चा झाली,'' असे आझाद यांनी पत्रकारांना सांगितले.
''पक्षाच्या अत्यंत लाजीरवाण्या स्थितीस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी नव्हे तर त्यांची मुले राहूल आणि प्रियंका गांधी हे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पक्षास वाईट अवस्था आली आहे,'' असे आझाद म्हणाले.
गुलाम नबी आझाद म्हणाले, ''सोनिया गांधी यांच्यासोबत चांगला संवाद झाला. काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, यावर एकमताने निर्णय घेतलेला आहे. आम्हाला फक्त काही सूचना सांगायच्या होत्या. त्या आम्ही सांगितल्या," सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूवीर्ही जी-२३ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.