आमदारकी पदरात पडताच काँग्रेस नेत्याचा खासदारकीचा राजीनामा

काँग्रेसला पंजाबमध्ये केवळ १८ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामध्ये एका राज्यसभा खासदारांचाही समावेश आहे.
Congress
CongressSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आम आदमी पक्षाने (AAP) काँग्रेससह सर्च पक्षांचा आसमान दाखवलं. काँग्रेसच्या (Congress) अनेक शिलेदारांचा पराभव झाला. पक्षाला केवळ १८ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामध्ये एका राज्यसभा खासदारांचाही समावेश आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी सोमवारी खासदारकीचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे आपच्या दिल्लीतील एका आमदाराला राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारी मिळाल्यानं त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा (Pratap Singh Bajwa) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळही संपत आहे. तसेच राज्यात आपने ९२ जागा जिंकल्याने इतर पक्षाचा उमेदवार राज्यसभेत निवडून जाऊ शकत नाही. त्यामुळे बाजवा यांना आपच्या लाटेत आमदारकीची लॉटरी लागली आहे. आता ते राज्यसभेऐवजी पंजाब विधानसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील. बाजवा हे काँग्रेसचा माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे.

Congress
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली थेट राज्यसभेची लॉटरी

आमदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेची लॉटरी

आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबचे मैदान मारल्यानंतर आता राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पंजाबमध्ये ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत काँग्रेसचा अक्षरशः सुपडासाफ केला आहे. त्यामुळे राज्यसभेत संसदेत 'आप'ला पाच खासदारांचा बोनस मिळणार आहे. आपकडून सोमवारी राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

क्रिकेटपटू हरभजनसिंग (Harbhajan Singh) याला 'आप'ने पंजाबमधून (Punjab) उमेदवारी घोषित केले आहे. मागील काही दिवसांपासून हरभजनसिंगच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यानुसार पाच नावांमध्ये त्याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच आपने एक चकित करणारं नाव जाहीर केले आहे. दिल्लीतील आपचे आमदार व मुख्य प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनाही राज्यसभेत पाठवले जाणार आहे.

चढ्ढा हे पंजाबमधील आपचे सह प्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या मतदारसंघातच सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी रान उठवलं होतं. त्याचा फटका चन्नी यांना बसल्याचे निवडणुकीत दिसून आले. पंजाबमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षिस चढ्ढा यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. ते ३३ वर्षांचे आहेत.

राज्यसभेच्या पाच नावांमध्ये आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक यांचाही समावेश आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती मानले जातात. पाठक हे पंजाबमध्ये तीन वर्षांपासून काम करत होते. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान असल्याची चर्चा आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे कृष्णा प्रण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल टॅस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com