Amravati Lok Sabha Election 2024 : देशात काँग्रेस सरकार येत आहे. असा दावा करत राहुल गांधी यांनी केंद्रात सरकार आल्यावर पहिल्यांदा काय करणार याची माहिती आज अमरावती येथे दिली. विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावती येथे जाहिर सभा घेतली. या सभेत अकोल्याचे उमेदवार डाॅ. अभय पाटील (Akola Lok Sabha Election), अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे (Amravati Lok Sabha Election) या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अॅड.यशोमती ठाकुर, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन देशमुख आदींची उपस्थिती होती.
या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले याची विचारणा उपस्थित लोकांना केली. त्याच बरोबर उद्योगपतींचे किती कर्जमाफी मोदी यांनी केली याची माहिती राहुल गांधी यांनी येथे दिली. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी ही निवडणुक आहे. नरेंद्र मोदी, आर एस एस संविधान आणि लोकशाही संपविण्यासाठी प्रयत्नरत आहे. यांच्या खासदारांनी निवडणुक जिंकली तर संविधान बदलण्याची गोष्ट केली आहे. संविधान कसे बदलणार हे आम्ही पाहु, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेली दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी 22-25 लोकांसाठी सर्वकाही केले. देशातील 70 कोटी लोकांकडे असलेल्या संपत्ती इतकी संपत्ती हिंदूस्थानच्या 22 लोकांकडे असल्याचा दावा गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी आणलेले किसान बील, जीएसटी, 16 लाख कोटी रुपये माफ करणे हे फक्त काही उद्योगपतींसाठी आहे. हिंदूस्थानतील शेतकऱ्यांचे, मजदूरांचे, दलितांचे, विद्यार्थ्यांचे कर्जमाफ मोदींनी केले नाही. 16 लाख कोटींचा अर्थ 25 वर्षेचे मनरेगाचा निधी, तर 16 लाख कोटींचा अर्थ पंचवीस वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल इतका निधी मोदींनी केवळ 22-25 लोकांना वाटल्याचा आरोप गांधी यांनी केला.
देशात आम्ही कोट्यावधी लोकांना लखपती तयार करु. काँग्रेस पक्षाचे सरकार कोट्यावधी लखपती कसे तयार करणार याची माहिती गांधी यांनी आज दिली. महालक्ष्मी योजनेत प्रत्येक गरिब परिवाराची लिस्ट आम्ही तयार करु. गरिब परिवारातील एका महिलेला दरवर्षी थेट बँक खात्यात एक लाख रुपये टाकणार आहोत. महिन्याला 8,500 रुपये मिळतील. वर्षाचे एक लाख रुपये कोट्यावधी महिलांना 'ठका ठक... ठका ठक...' महिन्याला टाकण्यात येतील असे राहुल गांधी म्हणाले.
शेतकऱ्यांना किती वेळा देणार कर्जमाफी
शेतकऱ्यांसाठी आयोग तयार करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी एकदाच नाही अनेक वेळा कर्जमाफी होऊ शकते. देशात उद्योगपतींचे कर्जमाफ होऊ शकते तर शेतकऱ्यांचे कर्जमाफी होऊ शकते. तर गरिबांचे कर्जमाफ होऊ शकते. त्यांचा कर्जमाफ करत नसाल तर उद्योगपतींचे कर्जमाफी करु नका. देशात 8 टक्के आदिवासी, 50 टक्के ओबीसी आहेत. 15 टक्के दलित आहे. 15 टक्के अल्पसंख्याक, 5 टक्के गरिब जनरल कास्ट आहेत. प्रत्येक नागरिक जीएसटी आणि करत देतो पण, सामान्य व्यक्तीची कर्जमाफी होत नाही. असा आरोप गांधी यांनी केला.
देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत. त्यामुळे त्यांना राम मंदिराचे उदघाटन, संसदेचे उदघाटनात बोलविण्यात आले नाही. तुम्ही वनवासी नाही आदिवासी आहात. देशात जातीय जनगणना करायची आहे. दलित, आदिवासी, ओबीसी,अल्पसंख्याक यांची निश्चित संख्या समोर येईल. जातीय जनगणनेसोबत आर्थिक पाहणी करणार असल्याचे गांधी म्हणाले. धवल क्रांती, हरित क्रांती झाली तसा क्रांतीकारक जातीय जनगणनेचा असेल ते आम्ही सरकार बनविल्यानंतर करणार असल्याचे गांधी म्हणाले.
राज्यात दूसऱ्या टप्प्यातील (Maharashtra Phase 2 Elections ) प्रचार आज संपत असुन त्या दृष्टीने काँग्रेसने आज राहुल गांधी यांची अमरावती येथे प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेत अकोल्याचे उमेदवार डाॅ. अभय पाटील (Akola Lok Sabha Election), अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे (Amravati Lok Sabha Election) या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले होते. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अॅड.यशोमती ठाकुर, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन देशमुख आदींची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.