Loksabha Election 2024 : भाजप चारशे पार; काँग्रेस मात्र, ३२५ च्या आसपास...

Congress News 2014 नंतर काँग्रेसला लोकसभेत तीन आकडी खासदार निवडून आणता आले नाही. यावेळी 325 पेक्षा अधिक उमेदवार काँग्रेसचे राहणार नाही. यापैकी किती उमेदवार निवडून येईल, हे 4 जूनला स्पष्ट होईल.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modisarkarnama

Congress Loksabha News : भाजपकडून यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी चारशे पार चा नारा देण्यात आला आहे. तर देशातील सर्वात जून पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र, यावेळेस केवळ ३२५ जागांवरच निवडणूक लढवून मित्र पक्षांना अधिक जागा देण्याची भूमिका घेतली आहे. पहिल्यांदाच काँग्रेस इतक्या कमी जागा लढवत असून या रणनितीचा पक्षाला फायदाच होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 421 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ 52 उमेदवार निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अलिकडच्या काळात सर्वाधिक उमेदवार उभे केले होते. ही संख्या 464 एवढी होती. परंतु काँग्रेसला सर्वाधिक कमी ठिकाणी विजय मिळाला होता.

यावेळी काँग्रेसला केवळ 44 जागांवर खासदार निवडून आले होते. 2009 मध्ये काँग्रेसने 440 जागा लढविल्या होत्या व 206 ठिकाणी विजय मिळविला होता. तर 2004 मध्ये 417 जागांवर उमेदवार उभे करून 145 जागांवर खासदार विजयी झाले होते. 2014 नंतर काँग्रेसला लोकसभेत तीन आकडी खासदार निवडून आणता आले नाही. यावेळी 325 पेक्षा अधिक उमेदवार काँग्रेसचे राहणार नाही.

Rahul Gandhi, Narendra Modi
Sangli Congress News : प्रदेश काँग्रेसची टीम गुरुवारी सांगलीत, पण विशाल म्हणतात; कारवाईचा प्रश्नच नाही

यापैकी किती उमेदवार निवडून येईल, हे 4 जूनला स्पष्ट होईल. काँग्रेसने कमी जागा जिंकून अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प केल्याचा दावा आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने आघाडी न केल्याने काँग्रेसच्या काही जागा वाढल्या, अन्यथा हा आकडा 300 पेक्षा खाली असता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने आतापर्यंत बहुतेक उमेदवारांची घोषणा केली आता केवळ सहाव्या व सातव्या टप्प्यातील उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, व पंजाबच्या काही उमेदवारांची घोषणा करणे शिल्लक आहे. यात अमेठी व रायबरेली या दोन मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे.

Edited By : Umesh Bambare

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi News : राहुल गांधींची तब्येत बिघडली; आज दिवसभर प्रचारापासून लांब...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com