Rahul Gandhi : मोठी बातमी ! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिस हाय अलर्टवर

Bomb Threat To Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना एक निनावी फोन आला होता. या फोनद्वारे राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Marathi News)

राहुल गांधी यांची सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू असून, काही दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. ही 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिकसह पुढे ठाणे आणि मुंबईत पोहोचणार आहे. या यात्रेची काँग्रेसकडून (Congress) जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपू्र्वी नाशिक (Nashik ) पोलिसांना एक निनावी फोन आला. या फोनद्वारे एका व्यक्तीने राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Sudhir Mungantiwar : वनमंत्री पुन्हा ठरले विक्रमवीर; जागतिक पातळीवर आणखी एका ‘रेकॉर्ड’ची नोंद

यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रं फिरवत धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू असून, फोन करणारा व्यक्ती हा माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तातडीने राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सध्या राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. या यात्रेत त्यांच्या भोवती अनेकदा मोठी गर्दीही होताना दिसते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधींचीही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती आहे. दरम्यान, धमकी देणारा व्यक्ती माथेफिरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून त्या व्यक्तीवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत आहे.

'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रात कधी ?

काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा'12 तारखेनंतर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यानंतर नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिकसह पुढे ठाणे आणि मुंबईत ही यात्रा जाणार आहे. मात्र, या दौऱ्यात राहुल गांधी ठिकठिकाणी संवाद साधणार आहेत. तसेच सभा, मेळावे, बैठकादेखील घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या 'भारत जोडो न्याय यात्रे'साठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुका पाहता राहुल गांधींची ही यात्रा महत्त्वाची असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Rahul Gandhi
Sudhir Mungantiwar : वनमंत्री पुन्हा ठरले विक्रमवीर; जागतिक पातळीवर आणखी एका ‘रेकॉर्ड’ची नोंद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com