Rahul Gandhi : नाशिकमधील घटनेनंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रहार; पुन्हा ‘जय जवान’चा नारा

Modi Government Agniveer Scheme Jay Jawan : नाशिक येथे दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला असून त्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : नाशिकमधील आर्टिलरी सेंटरच्या फायरिंग रेंजमध्ये सराव सुरू असताना झालेल्या बॉम्ब स्फोटात दोन अग्निवीरांचा नुकताच मृत्यू झाला. तोफेत बॉम्ब भरताना हा स्फोट झाला होता. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारवर निशाणा साधत पुन्हा ‘जय जवान’चा नारा दिला आहे. 

नाशकातील घटनेमध्ये मृत्यू झालेल्या दोन अग्निवीरांच्या बलिदानाचा सरकारने अपमान केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेमुळे पुन्हा एकदा अगिनवीर योजनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित जाले आहे. त्याचे उत्तर देण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे.

Narendra Modi, Rahul Gandhi
Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने इस्त्रायलचे पंतप्रधानही भावूक; मोदींना पाठवला खास संदेश

गोहिल विश्वराजसिंह आणि सैफत शित या दोन अग्निवीरांच्या निधनाची घटना दुर्दैवी आहे. इतर जवान शहीद झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या भरपाईप्रमाणेच या दोघांच्या कुटुंबालाही वेळेवर मदत मिळेल का, असा सवाल राहुल यांनी केला आहे.

अग्निवीरांच्या कुटुंबाला पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? दोन्ही सैनिकांची जबाबदारी आणि बलिदान समान असेल तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का?, असे सवालही राहुल यांनी केले आहेत. अग्निपथ योजना सैनिकांवर अन्याय करणारी आहे. आमच्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

Narendra Modi, Rahul Gandhi
Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरून राहुल गांधींनी महायुती सरकारला फटकारलं; म्हणाले, "महाराष्ट्रातील..."

एका सैनिकाचे जीवन दुसऱ्या सैनिकापेक्षा अधिक मुल्यवान कसे, याचे उत्तर पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना द्यावे लागेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी ‘जय जवान’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे.   

भाजप सरकारच्या अग्निवीर योजनेला हटवण्यासाठी, देशातील युवक आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जय जवान आंदोलनात सहभागी व्हा. सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात उभे राहू, असे आवाहन राहुल यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com