

Mumbai News : राहुल गांधींनी आता उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान दाढी आणि केस कापलेल्या केशकर्तनकार मिथुन याला खास गिफ्ट पाठवलं.
राहुल गांधी यांनी लालगंज इथला रहिवासी केशकर्तनकार मिथुन याला शॅम्पूची खुर्ची, केस कापण्यासाठी दोन खुर्च्याआणि एक इन्व्हर्टर बॅटरी पाठवली आहे. राहुल गांधींकडून मिळालेले हे साहित्य पाहून मिथुनला खूप आनंद झाला आणि त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.
लोकसभा (Lok Sabha) विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या कुशल जनसंपर्कावरून नेहमीच चर्चेत असतात. सुलतानपूरचे चर्मकार रामशेत यांची भेट घेतल्यानंतर त्यांना शूज शिवण्यासाठी मशीन पाठवली होती. ही मशीन मिळाल्यानंतकर रामशेत यांनी राहुल गांधींचे खुलेपणाने कौतुक केलं. राहुल गांधी दुकानात आल्यानंतर नशीब बदलले, अशी देखील प्रतिक्रिया रामशेत यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लालगंज जिल्ह्यामधील बृजेंद्रनगरमधील केशकर्तनकार मिथुन याला त्याच्या व्यवसायाशी निगडीत वस्तू गिफ्ट म्हणून पाठवल्या. राहुल गांधींकडून आलेलं हे गिफ्ट पाहून मिथुन खूप खुश झाला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लालगंज इथं 13 मे रोजी जाहीर सभा झाली होती. त्यानंतर तिथल्या केशकर्तनकार मिथुनच्या दुकानात थांबून दाढी आणि केस कापले होते. राहुल गांधी यांनी तिथं केस कापल्यानंतर मिथुनची सर्वत्र चर्चा झाली. तसंच सोशल मीडियावर देखील लोकप्रिय झाला.
राहुल गांधी यांनी त्याच्या दुकानात कापलेल्या केस आणि दाढी केल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. आता राहुल गांधी यांनी मिथुन याला शॅम्पू खुर्ची, केस कापण्यासाठी लागणाऱ्या दोन खुर्च्या आणि एक इन्व्हर्टर बॅटरी गिफ्ट म्हणून पाठवली आहे. राहुल गांधी यांनी हे गिफ्ट त्यांच्या कार्यकार्त्यांमार्फत पाठवलं आहे. ही गिफ्ट मिळताच मिथुन यांनं राहुल गांधींचे आभार मानले आहेत.
केशकर्तनकार मिथुन म्हणाला, "देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्यानं माझ्या छोट्याशा केशकर्तनालयात दाढी आणि केस कापले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या नेत्याची दाढी आणि केस मी आयुष्यात कधी कापू शकेन, असं कधीच वाटलं नव्हतं. आता त्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूने खूप खूश आहे".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.