Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांचे निधन; 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CPI(M) AIIMS Sitaram Yechury passed away : सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
Sitaram Yechury
Sitaram YechurySarkarnama
Published on
Updated on

Sitaram Yechury News : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) महासचिव सीताराम येचुरी यांचे गुरूवारी दिल्लीत निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 23 दिवस उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशनही केले होते. भाजप आणि आरएसएसचे कडवे विरोधक म्हणून येचुरी यांची ओळख होती.

Sitaram Yechury
Sharad Pawar NCP : संसदेतले कार्यालय शरद पवार गटालाच लोकसभा सचिवालयाने काढले नवे पत्रक

स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेच्या माध्यमातून ते 1974 मध्ये विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. विद्यार्थी चळवळीत काम करत असतानाच वर्षभरात त्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षात (मार्क्सवादी) प्रवेश केला. ते मुळचे मद्रासचे आहेत.

दिल्लीतील प्रसिध्द जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ते विद्यार्थी होते. विद्यापीठातील विद्यार्थी संघाचे ते तीनवेळा अध्यक्ष होते. पुढे त्यांनी एसएफआयचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. पश्चिम बंगाल किंवा केरळ या दोन राज्यांपैकीच एक विद्यार्थी या संघटनेचा अध्यक्ष असायचा. येचुरी हे या दोन्ही राज्यांव्यतिरिक्त अन्य राज्यांतील संघटनेचे पहिले अध्यक्ष ठरले होते.

Sitaram Yechury
Mayawati Vs Akhilesh Yadav : फोनमुळे तुटली अखिलेश यादव आणि मायावतींची आघाडी! काय घडलं होतं 2019 मध्ये...

माकपच्या केंद्रीय समितीचे ते अनेक वर्षे सदस्य राहिले. पश्चिम बंगालमधून ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी 2005 ते 2017 या कालावधीत राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले. प्रामुख्याने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांनी पक्षवाढीसाठी मोठे काम केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com