राहुल गांधी म्हणाले, हिंदू अन् हिंदुत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी!

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशभरातील प्रमुख प्रतिनिधींचे सेवाग्राम येथे चार दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आजपासून सुरू झाले.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

वर्धा : देशात दोन विचारधारा असून, त्यातील एक काँग्रेसची (Congress) तर दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भाजपची (BJP) आहे. काँग्रेसची विचारधारा सर्वांना जोडणारी आहे तर आरएसएस व भाजपची हिंदुत्वाची विचारधारा विभाजनवादी, व्देष पसरवणारी आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज केला. हिंदू (Hindu) आणि हिंदुत्व (Hindutva) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशभरातील प्रमुख प्रतिनिधींचे सेवाग्राम येथे चार दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आजपासून सुरू झाले. या शिबिराचा प्रारंभ राहुल गांधी यांच्या ऑनलाइन संबोधनाने झाला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, देशात हजारो वर्षांपासून असलेली विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी यांनी त्याचाच अवलंब केला आणि त्याच मार्गावरून काँग्रेस पुढे जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसचे आदर्श वेगळे आहेत. आरएसएस व भाजपचे आदर्श सावरकर तर काँग्रेसचे आदर्श महात्मा गांधी आहेत.

पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते पक्षाची विचारधारा समजून घेऊन नागरिकांपर्यंत पोचवत होते पण त्यात थोडा खंड पडला आहे. त्याला काही कारणे आहेत. आता मात्र पुन्हा नव्या जोमाने काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा आपल्याला संपूर्ण देशात पसरवायची आहे, जनतेला समजावून सांगायची आहे. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता, नेता तो कितीही ज्येष्ठ श्रेष्ठ असला तरी त्याला प्रशिक्षण अनिवार्य हवे. दहशतवाद, कलम ३७०, राष्ट्रीयता या मुद्यांवर चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यावर संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. त्याला ती लोकांसमोर व्यवस्थित मांडता आली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi
वानखेडे रडारवर; एनसीबीची एसआयटी जुनी प्रकरणेही उकरून काढणार

काही जण काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जातात पण ते तिथे राहू शकत नाहीत. भाजप, आरएसएस हे फक्त वापर करुन घेतात. तिथे सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही, असे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व परत काँग्रेसमध्ये आलेले नेते सांगतात. भीतीपोटी काही लोक भाजपमध्ये जातात पण तेथे ते फार काळ जगू शकत नाहीत. महादेवाने विष गिळंकृत करून संपवले त्याच प्रकारे काँग्रेसची विचारधारा भाजपच्या विखारी विचारधारेला गिळंकृत करून संपवेल. आज सगळीकडे द्वेष पसरवला जात आहे. हे चित्रही बदललेले दिसेल, असेही ते म्हणाले.

Rahul Gandhi
आर्यन एनसीबीच्या कार्यालयात गेला अन् चारच मिनिटांत पडला बाहेर

काँग्रेसची विचारधारा खेड्यापर्यंत तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी आधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील दुःख व भीती दूर करावी लागेल. त्यांच्या मनातील भीती व दुःख दूर करून त्यांना लढण्यासाठी सज्ज करायला हवे. भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावर नेहमी उत्साह व आनंद असतो तर भाजपा कार्यकर्त्यांचे चेहरे रागीट व भयग्रस्त दिसतात, असे राहुल गांधींनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com