आर्यन एनसीबीच्या कार्यालयात गेला अन् चारच मिनिटांत पडला बाहेर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या जामिनावर बाहेर आहे.
Aryan Khan
Aryan KhanSarkarnama

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) सध्या जामिनावर बाहेर आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणी त्याला अटक झाली होती. आज आर्यनने अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) कार्यालयात हजेरी लावली अन् चारच मिनिटांत तो बाहेर पडला.

क्रूझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली. यानंतर आर्यन ४ मिनिटांतच बाहेर पडला. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

आर्यनची पुन्हा चौकशी सुरू

मागील आठवड्यात एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर आर्यनला एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून आर्यनने यायचे टाळले होते. आज एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर तो एसआयटीसमोरही चौकशीसाठी हजर झाला. त्याची चौकशी सुरू आहे. बेलापूर येथील आरएएफ कॅम्पमध्ये त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Aryan Khan
सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट म्हणाले...

उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खान ३० ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातुन बाहेर आला होता. २ ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर समीर वानखेडेंच्या नेतृत्वात छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल २७ दिवसानंतर त्याची सुटका झाली होती.

Aryan Khan
सरन्यायाधीशांची भाजप सरकारला सोमवारची डेडलाईन!

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली आहे. आर्यन खानला जामीन देताना न्यायालयाने १४ प्रकारच्या अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. यात असा गुन्हा परत करु नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीरांवर प्रभाव टाकू नये, देश सोडून जावू नये अशा अटी टाकण्यात आल्या. त्यामुळे त्याचा पासपोर्ट देखील विषेश न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. आर्यनला तपास अधिकाऱ्यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच माध्यमांशी बोलण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात एनसीबी ऑफिसमध्ये हजर राहावे लागणार आहे. प्रत्येक सुनावणीला वेळेत हजर राहण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com