Sanjay Raut Tweet : आर के लक्ष्मणांच्या व्यंगचित्रातून सत्ताधाऱ्यांवर राऊतांचे फटकारे

Sanjay Raut : हे व्यंगचित्र देशातील सध्याच्या घडामोडींवर बरेच काही अप्रत्यक्षपणे सांगून जाते.
 Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut tweet r k laxman cartoon to answer ruler : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी काढलेले व्यंगचित्र टि्वट करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अचूक बोट ठेवलं आहे. राऊतांच्या टि्वटची चर्चा सुरु आहे. सत्य बोलणाऱ्या आवाज कसा दाबला जातो, यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

आर.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढतात, त्यातील एक व्यंगचित्र आज राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

दोष नसतानाही कारवाई करणाऱ्या सरकारच्या विरोधात भाष्य करणारे हे व्यंगचित्र देशातील सध्याच्या घडामोडींवर बरेच काही अप्रत्यक्षपणे सांगून जाते.

अदानी समुहाबाबत मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर खासदारकी गमवावी लागलेले राहुल गांधी, शिवसेनेचे प्रवक्त्या शीतल म्हात्रे-आमदार प्रकास सुर्वे यांचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक झालेले साईनाथ दुर्गे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात अटक झालेले काँग्रेसचे पदाधिकारी संदीप कुंदळे यांची आठवण राऊतांच्या टि्वटमुळे होते.

 Sanjay Raut
Dhirendra Shastri : बागेश्वर बाबा पुन्हा बरळले ; तुकोबारायानंतर आता साईबाबांविषयी उधळली मुक्ताफळे

भाजप-शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.त्यावर राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, "भाजप म्हणते गाय गोमाता आहे. सावरकरांना हे मान्य नव्हते. सावरकर गायीला उपयुक्त पशू मानायचे. गाईने दुध देणे बंद केले तर गोमांस खाण्यास काहीच हरकत नाही," असे सावरकरांचे विचार होते. हे विचार भाजपला मान्य होतील का?. आधी सावरकर वाचा आणि मग त्यांच्या नावाने यात्रा काढा.

 Sanjay Raut
NCP Sarpanch Murdered : NCP सरपंच प्रवीण गोपाळे खूनप्रकरणी मोठी अपडेट ; चार संशयित ताब्यात.

दाढी वाढवण्यावर सावरकरांचे जे विचार होते ते मुख्यमंत्री डॉ. मिंधे आणि त्यांचे ४० आमदार मान्य करणार का?, असा सवाल करत खासदार संजय राऊत म्हणाले, दाढी वाढवणे आपल्या धर्मात बसत नाही. त्यामुळे दाढी वाढवू नका. दाढी फक्त शिवाजी महाराजांनाच चांगली दिसते, असे सावरकरांचे विचार होते. सावरकरांचा कोणताही फोटो बघा ते कसे दिसतात. त्यामुळे सावरकरांचे विचार मुख्यमंत्री शिंदे यांना मान्य आहेत का?. या विचारांना अनुसरुन मिंधे आणि त्यांचे ४० आमदार दाढी कापणार का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com