Atishi Marlena elected as Chief Minister of Delhi : दिल्लीला आज तिसऱ्या महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत. सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर आता आतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांयकाळी उपराज्यपालांची भेट घेवून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवतील.
तत्पुर्वी आम आदमी पार्टीने घेतलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. ज्यास सर्व आमदारांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहेत.
दरम्यान, आतिशी यांच्या निवडीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल(Swati Maliwal) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आतिशी यांच्या निवडीवर जोरदार टीका केली आहे आणि आजचा दिवस अतिशय दु:खद दिवस असल्याचं म्हटलं आहे.
स्वाती मालिवाल यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, दिल्लीला एक अशा महिला मुख्यमंत्री आज लाभल्या आहेत, ज्यांच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरु याला वाचण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी अफजल गुरुला वाचवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिकेचा अर्जही केला होता.
त्यांच्या मते अफजल गुरु निर्दोष होता आणि त्याला राजकीय षडयंत्रातून अडकवलं गेलं होतं. तसं आतिशी मार्लेना या केवळ ‘Dummy CM’ आहेत. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे. देव दिल्लीचं रक्षण करो. असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलेलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.