Congress MLA Son Crime : काँग्रेस आमदाराचा मुलगा अन् भावासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल!

FIR against Congress MLA son and Brother : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि कोण आहेत ते काँग्रेसचे आमदार?
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Congress MLA family in trouble : कर्नाटकमधील रायचूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकाणी परंपरेच्या नावाखाली अनेक जंगली सशांना मारले गेले आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदाराचा मुलगा व भावासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कर्नाटकातील(Karnataka) रायचूर जिल्ह्यातील त्रुविहाल गावातील आहे. येथे युगादीच्या पुढच्याच दिवशी म्हणजेच सोमवारी स्थानिक मंदिरात उत्सवाचे आयोजन केले गेले होते. या दरम्यान मस्की येथील काँग्रेस आमदार बसनगौडा त्रूविहाल यांचे पुत्र सतीश गौडा आणि भाऊ सिद्दन गौडा एका जुलूसमध्ये सहभागी झाले होते. हे दोघे आणि यांच्यासोबतच्या काही जणांनी काठीवर जंगली सशांना लटकवून धारदास शस्त्रे हातात फिरवून शिकार करताना दिसून आले.

Crime
Udayanraje Bhosale : ''...तर मी गप्प बसणार नाही, तशी माझी ख्याती नाही'' ; उदयनराजे भडकले!

असं सांगितलं गेलं की, हे गाव आदिवासी परंपरेचा हिस्सा आहे. परंतु हे वन्यजीवन संरक्षण कायद्याच्याविरोधात आहे. त्यामुळे या सर्वांची आता अडचण वाढली आहे. शिवाय वनविभागानेही या प्रकरणाची माहिती घेत आमदाराचा भाऊ आणि मुलासह ३० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शिवाय पोलिसही वन विभागाच्या कारवाईनंतर कोर्टाच्या आदेशाची वाट बघत आहेत.

मस्की विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसनगौडा आपल्या भावाचा आणि मुलाचा बचाव करताना दिसून आले. त्यांनी म्हटले की ती लोकं शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे पालन करत होते. तसेच त्यांनी हेही सांगितले की, एक लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रथांबाबत लोकांमध्ये मी जागरुकता निर्माण करण्याच प्रयत्न करत आहे.

Crime
Prakash Ambedkar :''मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी मशिदीत...'' ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

आमदार बसनगौडा म्हणाले, युगादी दिवसानिमित्त मंदिराची शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये माझ्या भावाने अन् मुलानेही सहभाग नोंदवला. यामध्ये दाखवल्या गेलेल्या शस्त्रांचे पूजन केले गेले. ज्यानंतर जुलूस काढला गेला होता. हा परंपरेचा भाग आहे. जंगली सशाच्या शिकारीबाबत बोलायचं झालं, तर मला त्याबाबत कोणतीही माहिती नाही आणि माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने शिकार केलेली नाही.

तसेच, माझा मुलगा आणि भाऊ जुलूसात सहभागी झाले तेव्हा लोकांना त्यांना खांद्यावर उचलून घेतले. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि लोकांची भावना याच्याशी निगडीत आहे. मी एवढंच सांगेन की, संविधानानुसार जनतेत रूढीपरंपरांबाबत जागरुकता आणण्याची जी गरज आहे, त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. असंही आमदार बसगौडा म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com