Udayanraje Bhosale : ''...तर मी गप्प बसणार नाही, तशी माझी ख्याती नाही'' ; उदयनराजे भडकले!

Udayanraje Bhosale updates : आमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वसामान्यांबाबत काय परिस्थिती असेल? असा सवालही केला आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale sarkarnama
Published on
Updated on

Satara royal family land dispute News : सातारा राज घराण्याची जागा बेकायदेशीररित्या काही लोकांनी संगनमत करून बळकवली असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. उदयनराजे भोसले यांनी याबाबत मंगळवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, पुण्यासारख्या ठीकाणी लॅंड ग्रॅबिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुकुंद भवन ट्रस्टच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या जागा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्यांच्या जागांबरोबरच सातारा राजघराण्याच्या जागेवर देखील या ट्रस्टने बेकायदेशीररित्या आपला अधिकार सांगितला आहे.

Udayanraje Bhosale
Prakash Ambedkar :''मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी मशिदीत...'' ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

त्या त्या वेळच्या आधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी ही जागा हडपण्यास या ट्रस्टला मदत केली आहे. संघटित गुन्हेगारी सारखा हा प्रकार असून ज्या पद्धतीने संघटित गुन्हेगारीला मकोका कायदा लावला जातो, त्याच पद्धतीने या प्रकरणात देखील सरकारने कारवाई करावी अशी आपली मागणी असल्याचं उदयनराजांनी सांगितलं.

उदयनराजे पुढे म्हणाले, या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी सीबीआय मार्फत व्हावी. याची मागणी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करणार आहोत. मागील सहा वर्षांपासून आम्ही या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी करत आहोत. तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हडपलेल्या बेकायदा जमिनीबाबत सरकारला कळवलं होतं. यानंतरचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी देखील ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र अद्याप या प्रकरणात सुनावणी लावली जात नाही.

Udayanraje Bhosale
Prashant Kishor on Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात आता प्रशांत किशोर यांनी घेतली उडी, म्हणाले...

आमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वसामान्यांबाबत काय परिस्थिती असेल? त्यामुळे या प्रकरणात संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता सुनावणी कधी होईल याची आम्ही वाट पाहत आहोत. अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही. तशी माझी ख्याती नाही. मुकुंद भवन हा ट्रस्टच नाही. तो रजिस्टर ट्रस्ट नाही असा आरोप देखील उदयनराजे यांनी केला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com