राज्यसभा निवडणुकीत खेळ बिघडवलेला आमदार शहा अन् नड्डांच्या भेटीला दिल्लीत

कॉस व्होटिंगमुळे अजय माकन यांच्या पराभव झाला आहे.
Congress MLA Kuldeep Bishnoi News, Amit Shah Latest Marathi News
Congress MLA Kuldeep Bishnoi News, Amit Shah Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह हरयाणामध्येही भाजपने चमत्कार घडवला होता. पुरेसं संख्याबळ नसताना महाराष्ट्रात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. तर हरयाणात काँग्रेसचा आमदार फोडत भाजपने (BJP) अपक्ष उमेदवार निवडून आणला. या आमदाराला काँग्रेसनं पक्षातील सर्व पदांवरून हटवलं. आता या आमदाराने रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Congress Latest News)

हरयाणातील काँग्रेसचे आमदार कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाला आहे. माकन हे गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे नेते असल्याने त्यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला. त्यांनी भाजपने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांच्या पारड्यात मत टाकलं होतं.

Congress MLA Kuldeep Bishnoi News, Amit Shah Latest Marathi News
शिवसेना अन् शिंदे गटाच्या भांडणात आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचणार; 53 आमदारांना नोटीस

बिश्नोई हे राज्यसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच पक्षाच्या कोणत्याही बैठकीला हजर राहिले नाहीत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते आग्रही होते. याबाबत ते उघडपणे नाराजी व्यक्त करत होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांच्यावरही टीका केली होती.

राज्यसभेच्या निवडणुकीत आंतरआत्म्याचा आवाज ऐकून मतदान करणार असल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या मतदानाबाबत आधीपासूनच साशंकता होती. त्याप्रमाणे त्यांनी भाजपपुरस्कृत उमेदवाराला मतदान केल्याने माकन यांचा पराभव झाल्याचा दावा प्रदेश काँग्रेसने केला होता.

आता राज्यसभा निवडणुकीतनंतर महिनाभरातच बिश्नोई यांनी शहा आणि नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा झाल्याचे समजते. बिश्नोई यांनी मात्र ही भेट सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. पण त्यांना काँग्रेसमधील सर्व पदांवरून हटवल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे समजते. त्यांनी आपल्या ट्विटरवरून राहुल गांधींच्या फोटो तसेच काँग्रेसला उल्लेखही हटवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com