शिवसेना अन् शिंदे गटाच्या भांडणात आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचणार; 53 आमदारांना नोटीस

व्हीप डावल्याप्रकरणी दोन्ही बाजूने विधिमंडळ अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 16 आमदारांच्या निलंबनाच्या नोटिसीवर सोमवारी (ता. 11) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण त्याआधीत विधिमंडळ सचिवांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Shiv Sena Latest Marathi News)

विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती, प्रतोद, गटनेता कोण हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. तर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व शिवसेनेने (Shiv Sena) एकमेकांविरोधात व्हीप काढले होते. आता दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलेल्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुण्यात शिवसेनेला खिंडार ; साळी, भोसले देणार राजीनामा

शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक व बहुमत चाचणीसाठी व्हीप काढला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे तसेच बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते. पण या आमदारांनी नार्वेकरांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांची तक्रार करण्यात आली. यातून आदित्य यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे.

तर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही महाविकास आघाडीला मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. पण शिंदे गटाकडून त्याचे पालन न करण्यात आल्याने चाळीस आमदारांविरोधात तक्रार करण्यात आली होती. दोन्ही तक्रारींची दखल विधिमंडळ सचिवांनी घेतली असून त्यानुसार आदित्य ठाकरे वगळता दोन्ही बाजुकडील सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील सात दिवसांत बाजू मांडण्यास सांगितले आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
मुंबईत परतल्यावर दोघे चर्चा करु पण आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित : एकनाथ शिंदे

दरम्यान, आदित्य हे यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आली नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे आदित्य यांना नोटीस पाठवली नसल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही गोगावले म्हणाले. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उर्वरित आमदारांवर मात्र निलंबनाची टांगती तलवार राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com