Rajasthan Politics : काँग्रेस खासदार गोगोईंनी घेतली भाजप नेत्या वसुंधरा राजेंची भेट ; फोटो व्हायरल

Vasundhara Raje News : गोगोई यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून वसुंधरा राजे यांच्या सोबतचा फोटो शेअर केले आहे.
Vansudhara Raje, Gaurav Gogoi News
Vansudhara Raje, Gaurav Gogoi NewsSarkarnama

Gaurav Gogoi Viral Photo: राजकारणात प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ लावला जातो. तसेच एका फोटोत हजार शब्द व्यक्त करण्याची ताकद असते. असाच एक फोटो राजस्थानमधून समोर आला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि काँग्रेसचे (Congress) खासदार गौरव गोगोई यांच्या भेटीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. गोगोई यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून वसुंधरा राजे यांच्या सोबतचा फोटो शेअर केले आहे.

गौरव गोगोई यांनी दोन दिवसांपूर्वी वसुंधरा राजे यांची भेट घेतली होती. उदयपूर विमानतळावर वसुंधरा राजे आणि गोगोई यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीचे अनेक वेगवेगळे अर्थही काढले जात आहेत. राजस्थामध्ये वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच काँग्रेस आणि भाजप (BJP) नेत्याची भेट झाल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

Vansudhara Raje, Gaurav Gogoi News
Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर पुन्हा डागली तोफ ; म्हणाले,'' मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज...''

वसुंधरा राजे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत हे चित्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हायरल फोटोबाबत भाजप नेत्यांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच ते काँग्रेसकडूनही आलेले नाही. हा फोटो शेअर करताना गौरव गोगोई यांनी म्हटले आहे ''राजस्थानच्या (Rajasthan) माजी मुख्यमंत्री बसुंधरा राजे यांची उदयपूर विमानतळावर भेट घेतली. राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.''

Vansudhara Raje, Gaurav Gogoi News
One Nation One Election : 'एक देश, एक निवडणुकी'वर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, इंडिया म्हणजे..

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात मणिपूरच्या मुद्यावरून विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीने लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो अविश्वास प्रस्ताव मांडताना गौरव गोगोई यांनी केलेल्या भाषणामुळे ते संपूर्ण देशात चर्चेत आले होते. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत अनेक मुद्दे उपस्थित केले होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com