One Nation One Election : 'एक देश, एक निवडणुकी'वर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, इंडिया म्हणजे..

Rahul Gandhi news : केंद्र सरकारने 'एक देश एक निवडणूक' अशी घोषणा करत यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.
Rahul Gandhi news
Rahul Gandhi news Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : केंद्र सरकारने 'एक देश एक निवडणूक' अशी घोषणा करत यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. यावरून आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. ट्विट करत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

"इंडिया म्हणजे भारत,विविध राज्यांचे एक संघटन,पण एक देश, एक निवडणूक ही संकल्पना संघ राज्यांवर हल्ला आहे." असं ट्विट करत राहुल गांधींनी भारताची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणुकीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता. मात्र, त्यांनी सहभागी होण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही निशाणा साधला होता.

Rahul Gandhi news
Sudhir More Death Case| सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; 'त्या' बाईने माझ्या बापाचा छळ केला; मुलाच्या दाव्याने खळबळ

ही समिती घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे. तर, हे व्यावहारिक आणि तार्किक दृष्टिकोनातून देखील योग्य नाही. सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते न ठेवणे हा लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या स्थितीत समितीचे सदस्य होण्याचे निमंत्रण नाकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असही चौधरी यांनी म्हटलं आहे.

'एक देश एक निवडणुकीसाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती ही भारताच्या संसदीय लोकशाहीला हानी पोहोचवण्याचा पद्धतशीर प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केली. तर, एक देश, एक निवडणूक, यासाठी उच्चस्तरीय समिती ही एक कर्मकांड आहे. समितीची वेळही अत्यंत शंकास्पद आहे. यासंदर्भाच्या अटी आणि शिफारसीही आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही योग्यरित्या समितीचा भाग होण्यास नकार दिल्याची प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com