Congress MP Arrested : मोठी बातमी! काँग्रेस खासदाराला पोलिसांनी भर पत्रकारपरिषदेतून केली अटक ; बलात्काराचा आहे आरोप

Congress MP Arrested in Rape Case : जाणून घ्या, नेमके कोण आहेत खासदार आणि कुठे घडला आहे हा खळबळजनक प्रकार?
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress MP Rakesh Rathod Arrested in Rape Case : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका पीडित महिलेने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर १२ दिवसांनी आज(गुरुवार) पोलिसांनी काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केली तेव्हा खासदार राकेश राठोड हे एका पत्रकारपरिषदेत बोलत होते.

या घटनेलात्यांनी राजकीय षडयंत्र संबोधले आणि म्हटले की, भूमाफिया विरोधात मोहीम राबवल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली गेली. तसेच त्यांनी न्यायालय आणि देवावर पूर्ण विश्वास असल्याचेही म्हटले. तसेच त्यांनी हेही म्हटले की, सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांनी आधी सभासद होवून दाखवाव आणि खासदार लिहिणं शिकावं यानंतर एखादी मागणी करावी.

Congress
Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवाल नव्या अडचणीत? निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस अन् मागितला पुरावा

दुपीरा साधारण दीड वाजता खासदारास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेले. जिथे खटल्याबाबत जबाब नोंदवले जात आहेत. जबाब नोंदवल्या गेल्यानंतर पोलीस त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहे. तर अटकेची माहिती मिळताच काँग्रेस(Congress) खासदार राठोड यांचे कुटुंबीय आणि समर्थक पोलिस ठाण्यात पोहचले होते.

पीडित महिलेचे म्हणणे आहे की, वर्ष 2018मध्ये राकेश राठोड आमदार होते. याचवर्षी त्यांच्याशी ओळख झाली होती. यानंतर राकेश राठोड यांनी त्यांना संरक्षण देत राजकारणात पुढे आणणार असल्याचा विश्वास दिला. काही दिवसांनी त्यांनी एका जातीय संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष बनवले आणि जवळीक वाढवली.

Congress
George the Giant Killer : ....अन् तेव्हापासून जॉर्ज फर्नांडिस यांना 'जॉर्ज द जायंट किलर' म्हणणं सुरू झालं

तर तक्रारीनुसार, वर्ष 2020मध्ये राकेश राठोड यांनी पीडित महिलेस घरी बोलावून जबरदस्ती अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर राकेश राठोड यांनी पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगून पीडितेला तिच्याशी लग्न करणार असल्याचा विश्वास दिला. यानंतर राठोड यांनी पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केला.

आरोपात असंही म्हटलं गेलं आहे की, पुढे खासदार बनल्यानंतर 24 ऑगस्ट 2024 रोजी राकेश राठोड यांनी पीडित महिलेस आपल्या घरी बोलावले होते आणि त्यानंतरर राठोड यांनी एका साध्या कागदावर आक्षेपार्ह शब्द लिहून स्वाक्षरी करायला लावली. तसेच हे देखील म्हटले की, जर विरोध केला तर तुझी बदनामी करू. एवढचं नाहीतर आरोप आहे की विरोध केल्यानंतर खासदार राठोड यांनी पीडितेच्या जीवाला आणि तिच्या मालमत्तेला धोका निर्माण करण्याची धमकी दिली. तर लोकलज्जेखातर पीडित महिला गप्प राहिली. यानंतरही पीडित महिलेचे शोषण केले गेले. अखेर पीडित महिला पोलिसांकडे पोहचली आणि साक्ष दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com