Shashi Tharoor News : सोने तस्करीतील व्यक्तीशी संबंधांबाबत शशी थरूर यांची कबुली

Gold Smuggling News : दिल्ली विमानतळावर सोने तस्करीच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील एक जण थरूर यांचा माजी स्वीय सहायक असल्याचे सांगितले जात आहे.
Shashi Tharoor
Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi Latest News : दिल्ली विमानतळावरून सोने तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाचे नाव शिव कुमार प्रसाद असून ही व्यक्ती काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor News) यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. थरूर यांनीही याबाबत कबुली दिली आहे. शिव कुमार हे थरूर यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

शिव कुमारसह (Shiva Kumar Prasad) दोघांना बुधवारी दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 500 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सोन्याच्या तस्करीचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवकुमार हा थरूर यांचा सध्या स्वीय सहायक म्हणून काम करत असल्याची जोरदार चर्चा होती. (Gold Smuggling News)

Shashi Tharoor
Maharashtra Election Update : बारामती, चंद्रपूर, नाशिक, अमरावती..! सट्टा बाजारात कुणाची चलती?

थरूर यांनी शिव कुमारच्या अटकेनंतर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शिवकुमार हे 72 वर्षांचे असून त्यांचे डायलिसिस सुरू असल्याने त्यांना आपल्या टीममध्ये पार्टटाईम सेवेत घेण्यात आले होते, असे थरूर यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

‘मी धर्मशाला येथे निवडणूक प्रचारात असताना, माझ्या स्टाफमधील एका माजी सदस्याचा सहभाग असल्याचे ऐकून मला धक्का बसला. एअरपोर्ट फॅसिलिटेशन असिस्टंट म्हणून ही व्यक्ती माझ्या स्टाफमध्ये होती. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणार नाही. तपासामध्ये यंत्रणांनी कायद्यानुसार आवश्यक कारवाई करावी,’ असे थरूर यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Political news)

दरम्यान, शिव कुमार हा दुबईतून येणाऱ्या एका प्रवाशाला नेण्यासाठी दिल्ली विमानतळावर आला होता. हा प्रवासी शिव कुमार सोने देत असताना दोघांनीही ताब्यात घेण्यात आले. विमानतळावर प्रवेशासाठी शिव कुमारने एअरोड्रोम एन्ट्री परमिट कार्डचा वापर केला होता.

शिव कुमारचा शशी थरूर यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने टीकेची झोड उठवली. सीपीएम आणि काँग्रेस यांची सोने तस्करांशी युती असल्याची टीका भाजपने केली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही टीका केली. तिरुवअनंतपुरम लोकसभा मतदारसंघात ते थरूर यांच्या विरोधात उमेदवार आहेत.  

Shashi Tharoor
Maharashtra Election Update : बारामती, चंद्रपूर, नाशिक, अमरावती..! सट्टा बाजारात कुणाची चलती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com