Lok Sabha Election : गडकरी, फडणवीस अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचा शंखनाद करणार

Congress Rally In Nagpur On 28th December : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसची मोठी सभा महाराष्ट्रात होणार आहे...
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. मात्र, तेलंगणमध्ये सत्ता आल्याने काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला. काँग्रेसने खचून न जाता आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या नागपुरात काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

Congress News
Rajasthan CM Oath : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीत चर्चा कट्टर विरोधकांची; गेहलोत अन् शेखावत व्यासपीठावर एकत्र

139व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम काँग्रेसने येत्या 28 डिसेंबरला नागपुरात आयोजित केला आहे. या निमित्ताने काँग्रेसने एक जंगी सभा आयोजित केली आहे. या सभेला पक्षातील सर्व प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेतून काँग्रेस लोकसभा 2024 निवडणुकीसाठी शंखनाद करेल, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सभेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही उपस्थित राहणार आहे. या सभेला १० लाखाहून अधिक लोकांची उपस्थिती राहील, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'भाजपच्या सत्तेत दोन वेळा संसदेवर हल्ला'

संसदेवर दोन वेळा हल्ला झाला. केंद्रात भाजपची असताना हे हल्ले झाले. ससंदेत काय चालले आहे, हे संपूर्ण देशाला दिसले. भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये. भाजप सरकारला जनता वैतागली आहे, अशी टीका वेणुगोपाल यांनी केली. संसदेतील घडलेल्या घटनेवर विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. वेळ आल्यावर शहा हे प्रत्येकाला उत्तर देतील, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.

edited by sachin fulpagare

Congress News
Lok Sabha Congress Plan: लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन; उत्तर प्रदेशात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com