Congress News : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नवी दिल्ली येथील मुख्यालय बदलणार आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेसचे अकबर रोडवरील कार्यालय मध्य दिल्लीतील कोटला रोड परिसरात स्थलांतरित केले जाणार आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असून या इमारतीला ''इंदिरा भवन' असे नाव दिले जाणार आहे. याच इमारतीतून आता काँग्रेसची रणनीती ठरणार आहे.
काँग्रेस मुख्यालयाचा (Congress Headquarter) पत्ता सध्या '24 अकबर रोड' (Akbar Road) असा आहे. 45 वर्षांपासून याच कार्यालयातून रणनीती ठरत होती. पक्षाला मिळालेली उभारी आणि अनेक निवडणुकीतील (Election) पराभवाचे हे कार्यालय साक्षीदार आहे. या कार्यालयात 1978 पासून काँग्रेसचे कामकाज चालत होते. नवीन कार्यालय हे भाजपच्या (BJP) मुख्यालयाजवळच असणार आहे.
काही वर्षांपासून काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू आहे. ही इमारत प्रशस्त आणि अत्याधुनिक असणार आहे. इमारतीत सहा मजले असून इथे सेवा दल, युवक काँग्रेस, 'एनएसयूआय'ची राष्ट्रीय कार्यालयेही स्थलांतरित केली जाण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबर रोजी काँग्रेसचा स्थापना दिन आहे. यादिवशी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून ध्वजारोहण केले जाईल. हे जुन्या मुख्यालयातील शेवटचे ध्वजारोहण असेल.
काँग्रेसच्या मुख्यालय स्थलांतराबाबतचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेस मुख्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मागील काही महिन्यांपासून मुख्यालय स्थलांतराबाबत चर्चा सुरू आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.