Mallikarjun Kharge On PM Modi : मोदी विरोधी पक्षांना तुच्छ लेखतात; मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'पंतप्रधान बिहार निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र'

Cogress Mallikarjun Kharge Criticizes PM Narendra Modi During Raipur Rally in Karnataka : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
Mallikarjun Kharge On PM Modi
Mallikarjun Kharge On PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Congress BJP political news : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्याचा आरोप केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकांना पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवर टीका केली.

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणारा काँग्रेस हा पहिला पक्ष होता. ही बैठक दोनदा बोलावण्यात आली होती. पण पंतप्रधान दोन्ही वेळा उपस्थित राहू शकले नाहीत", याची आठवण मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली.

मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस (Congress) मंत्री आणि आमदार रायचूरमध्ये होते. त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आणि रायचूर विद्यापीठाच्या नामांतर समारंभाचे अध्यक्षस्थान मल्लिकार्जुन खर्गे यांनी भूषवले.

खर्गे म्हणाले, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणारा काँग्रेस हा पहिला पक्ष होता. ही बैठक दोनदा बोलावण्यात आली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन्ही वेळा उपस्थित राहू शकले नाहीत. मी त्यांना विचारू इच्छितो की, ते का उपस्थित राहिले नाहीत".

Mallikarjun Kharge On PM Modi
Maharashtra Political Live Updates : इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

'कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे नेते बैठकीला उपस्थित राहण्यासाठी महत्त्वाचे कार्यक्रम सोडून आले होते. परंतु पंतप्रधान देशात असूनही त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी मोदी बिहार निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते', अशी टीका देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

Mallikarjun Kharge On PM Modi
MNS local body contest : महाराष्ट्रातील मनातील जेंव्हा होईल, तेव्हा पाहू! मनसैनिक शिवसेना ठाकरे पक्षाच्या टाळीच्या भरोशावर थांबेना!

अनुपस्थितीचा अर्थ काय?

'मोदी यांच्या अनुपस्थितीचा अर्थ काय? एकीकडे देश आणि सैनिक लढत असताना मोदी यांनी प्रचार करण्याचा पर्याय निवडला. हे अयोग्य आहे. असे वर्तन चांगले संकेत देत नाही. जर तुम्ही विरोधी पक्षांना वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला तर नेते, जनता आणि विशेषतः या देशातील तरुण ते सहन करणार नाहीत', असा घणाघात देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

वैयक्तिक श्रेय घेण्याचा प्रयत्न

पंतप्रधानांची अनुपस्थिती विरोधकांबद्दलचा त्यांचा कमी आदर दर्शवते, असे सांगताना संपूर्ण राष्ट्र आणि सशस्त्र दल देशाचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करत होते. मात्र काही व्यक्ती वैयक्तिक श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. जर त्यांनी सैन्यात कॅप्टन, कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल म्हणून काम केले असते, तर आम्ही त्यांचे चांगल्या कामाबद्दल आणि देशासाठी लढल्याबद्दल कौतुक केले असते. पण तसे नाही, असे खर्गे यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com