अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर'सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराणमध्ये 12 तासांसाठी पूर्ण आणि पूर्णपणे युद्धबंदीवर सहमती झाली आहे.' यानंतर युद्ध संपल्याचे मानले जाईल! अधिकृतपणे, इराण युद्धबंदी सुरू करेल आणि 12 व्या तासाला, इस्रायल युद्धबंदी सुरू करेल आणि 24 व्या तासाला, 12 दिवसांच्या युद्धाच्या अधिकृत समाप्तीला जगाकडून सलाम केला जाईल. इराणकडून युद्धबंदीचे एकमत नाही, तर इस्त्राइलकडून हल्ले सुरू आहेत.
15 दिवसांपासून राज्या वाऱ्यावर सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार गावात बसून राहिले. अजित पवार यांचा माळेगाव साखर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत विजय झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात (Court) होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती आणि दोष मुक्तीच्या अर्जावरती विशेष सरकारी वकील उज्वल निकम आज युक्तिवाद करणार आहे.
बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला निकाल जाहीर झाला असून 'ब' वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 91, तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडली आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती. आज या निवडणुकीची मतमोजणी बारामतीतील प्रशासकीय भवनमधील अभियांत्रिकी भवन इथं सुरू आहे.
'ऑपरेशन सिंदूर'मुळे सर्व उद्दिष्टे साध्य झाली आणि दहशतवाद्यांच्या मनामध्ये भीती बसवण्यात यश आले आहे, असा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 51 भाषणांच्या संग्रहाचे प्रकाशन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय स्तरावरील वार्षिक प्रांत प्रचारक बैठक यावर्षी दिल्ली (Delhi) इथं चार ते सहा जुलैला होणार आहे. केशवकुंज या संघ कार्यालयात होणाऱ्या बैठकीला देशभरातली प्रांत प्रचारक, सह-प्रांत प्रचारक आणि क्षेत्र प्रचारक उपस्थित राहतील. संघाच्या आगामी योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातील 25 ग्रामसेवक प्रशासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यातील 21 जणांवर दोष सिद्ध झाल्याने कारवाई होणार आहे. आज 7 ग्रामसेवकांची अंतिम सुनावणी जिल्हा परिषद कार्यालयात होणार आहे. या ग्रामसेवकांवर गावात बैठका न घेणे, वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये अडकणे, विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणे, कारभारात अनियमितता करणे, रेकॉर्ड न ठेवणे, ग्रामपंचायत कार्यालयात नियमित हजर न राहणे, असे आरोप आहेत. या दोषी सिद्ध झालेल्या ग्रामसेवकांवर वेतनवाढ रोखणे, मूळ वेतनावर आणणे, ठपका ठेवणे, निलंबन करणे, बडतर्फ असे कारवाई होण्याची शक्यता आहे.
बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Election) तब्बल 90 टक्क्यांहून अधिक मतदान झालं असून, आज मतमोजणी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत एकूण 90 उमेदवार रिंगणात असून, 67 मतदान केंद्रांवर 19 हजार 549 मतदारांपैकी सुमारे 16 हजार 523 मतदारांनी आपला हक्क बजावला.
दिल्ली राज्याची सत्ता गमावलेल्या आम आदमी पक्षाने (AAP) गुजरात आणि पंजाबमधील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून दमदार राजकीय पुनरागमन केले आहे. चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत केरळमध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तर गुजरातमधील दोनपैकी एक जागा भाजपने जिंकली आहे. या निकालामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना दिलासा मिळाला आहे.
सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला जबर धक्का बसला आहे. मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेमध्ये पक्ष प्रवेश केला. चंद्रकांत मैंगुरे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे मिरजेतील शिवसेने ठाकरे पक्षाला खिंडार पडलं आहे.
अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर ताणव आणखी वाढला असतानाच, इराणी राज्यकर्त्यांवर जागतिक आणि देशांतर्गत दबाव वाढल्याचे मानले जात आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणीमधील राजवटीत बदल संभवतात, असे विधान केल्याने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी कोणतेही ठोस आश्वासन देणे टाळले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.