
Yogendra Yadav on voting process : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन राज्यातील मतदान यांनी तीन राज्यातील मतदार चोरीवर गंभीर आरोप केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागलं आहे.
यावर स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी टिप्पणी करत निवडणूक आयोग आणि त्यांच्या मतदार नोंदणीच्या कार्यपद्धतीला अधिकच अडचणीत आणले आहे.
योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘मागील अनेक दशकांपासून मी देशातील निवडणूक प्रक्रियेचे समर्थन करतो आहे. अवघ्या जगाला आमच्या निवडणूक आयोगाकडून शिका, असे सांगतो आहे. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे सगळे चित्रच बदलले. मागील 35 वर्षे मी आयोगाचे समर्थन केले पण आता ते शक्य होणार नाही.’’
योगेंद्र यादव यांची निवडणूक आयोगाविषयी (Election Commission) दिलेली प्रतिक्रिया व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहे. यात योगेंद्र यादव यांनी, ‘‘कर्नाटकमधील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख बोगस मते पडली असून 15 ते 20 टक्के एवढ्या मतदारयाद्या बनावट असल्याचे दिसून आले आहे. कोणताही विश्वासार्ह निवडणूक आयोग या प्रकाराची चौकशी करून याद्याबाबतचा गोंधळ दूर करेल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करेल".
'सध्या आपल्या निवडणूक आयोगाचे वर्तन अगदी त्या विरोधात असल्याचे दिसते. तो आता विरोधी पक्ष नेत्यालाच धमकावतो आहे. महाराष्ट्रामध्ये हळूहळू मतांची चोरी झाली पण बिहारमध्ये मात्र दिवसाढवळ्या दरोडा घातला जातो आहे. देशाला याबाबत उत्तर हवे आहे. इतिहास हे लक्षात ठेवेल', असा हल्लाबोल देखील योगेंद्र यादव यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरूच ठेवले आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) संस्थात्मक चोरी असे म्हणत, गरिबांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोग भाजपशी खुलेआम संगनमत करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी युट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत हा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.