Shivsena Politics : एकनाथ शिंदेंचा मंत्री अडचणीत? सप्टेंबरमध्ये होणार फैसला!

Sanjay Shirsat Vs  Raju Shinde : 2024 मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट हे सलग चौथ्यांदा विजयी झाले होते.
Eknath Shinde 1
Eknath Shinde 1Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat News : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरुद्ध पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वकिलांनी वेळ मागून घेतल्याने याप्रकरणाची सुनावणी आता चार आठवड्यांनी म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांच्यापुढे गुरुवारी (ता. सात) ही सुनावणी झाली.

राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबर यांच्यावतीने खंडपीठात संजय शिरसाट यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. तर संजय शिरसाट यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. गुरुवारी बाजू मांडताना ॲड. राजेंद्र देशमुख यांनी संजय शिरसाट यांच्याविरुद्ध आरोपावरील त्रुटी त्याची पूर्तता केलेली नसल्याने ही निवडणूक याचिका फेटाळून लावावी, अशी खंडपीठाला विनंती केली.

तसेच शिंदे यांच्यावतीने लेखी उत्तरही दाखल करण्यात आले नसून, आमचा दावा दस्ताऐवजावर (रेकाॅर्ड) घ्यावा, अशीही एक विनंती करण्यात आलेली आहे. त्यावर शिंदे यांच्या वकिलांकडून उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी चार आठवड्यात ठेवण्यात आली आहे. ॲड. राजेंद्र देशमुख यांना मुकुल कुलकर्णी, अमोल जोशी, अभयसिंह भोसले, श्रीराम देशमुख यांनी सहकार्य केले.

Eknath Shinde 1
Eknath Khadse : चाकणकरांनी जावयाच्या मोबाईमधील डेटा बाहेर काढताच खडसे संतापले, म्हणाले, "सोयीनुसार महिलांची बदनामी..."

संजय शिरसाटांचा 16 हजार मतांनी विजय

2024 मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट हे सलग चौथ्यांदा विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांचा तब्बल 16 हजार 351 मतांनी पराभव केला होता.

Eknath Shinde 1
Eknath Shinde News : न्या. अभय ओक यांनी एकनाथ शिंदेंसमोरच केला कलम 21 चा उल्लेख अन् प्रश्नांची सरबत्तीही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com