राजकारणाच्या बदलेल्या गणितांनी भाजप विरोधकांनाही भूमिका बदलायला लावल्या आहेत...

यात काँग्रेस (Congress) असो, समाजवादी पक्ष (Samajwadi) असो की बहुजन समाजवादी पक्ष (BSP) असो.
akhilesh-Mayawati
akhilesh-Mayawatisarkarnama

लखनऊ : राजकारणात तसे बघितले तर निष्ठा बदलणे ही काही नवीन गोष्ट नाही. पण निवडणूकांच्या काळात हा प्रकार आपल्याला जास्त बघायला मिळत असतो. उत्तरप्रदेशमध्ये देखील सध्या असेच काही बघायला मिळत आहे. कारण तिथल्या राजकारणाच्या बदलेल्या गणितांनी भाजपच्या विरोधकांनाही भूमिका बदलायला लावल्या आहेत. मग यात काँग्रेस असो, समाजवादी पक्ष असो की बहुजन समाजवादी पक्ष असो. सध्या निवडणूकीच्या काळात या सगळ्याच पक्षांनी आपल्या जुन्या निष्ठांपासून पाठ फिरवली आहे किंवा आता इतर विचारसरणीचे मतदार देखील आपले असावेत यासाठी हा मार्ग स्विकारलेला असू शकतो असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. आता कसे?

तर पुरोगामी म्हणवला जाणारा, मंदिर पॉलिटिक्स पासुन लांब असणारा काँग्रेस पक्ष मागच्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये जाताना दिसून येवू लागला आहे. नुकतच प्रियंका गांधी यांनी वाराणसीच्या एका सभेत बोलताना आपण खाटी हिंदू असल्याचे म्हंटले आहे. याआधी राहुल गांधी यांनी देखील आपण जानवेधारी असल्याचे म्हंटले होते. तसेच गुजरात निवणूकांच्यावेळी ते मंदिरांमध्ये देखील दिसुन आले होते. ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपला उत्तर देताना स्वतःला ब्राह्मण असल्याचे सांगत शांडिल्य गोत्र असल्याचे म्हंटले होते.

akhilesh-Mayawati
मोठी बातमी : उत्तर प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीची युती

एम-वाय समीकरणांपासून समाजवादी पक्षाने स्वतःला लांब ठेवले.

समाजवादी पक्षाचे राजकारण कायमच एम-वाय (मुस्लीम-यादव) समीकरणांभोवती फिरताना दिसून येते. पण यावेळी मात्र समाजवादी पक्षाने एम-वायची वेगळी ओळख सांगायला सुरुवात केली आहे. एम म्हणजे महिला आणि वाय म्हणजे युवा अशी पुनर्व्याख्या सध्या करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव स्वतः सांगत आहेत की पक्षाने सत्तेत असताना महिला आणि तरुणांसाठी खूप काम केले आहे आणि यावेळी हेच काम समाजवादी पक्षाची ताकद बनेल. असं म्हंटलं जातयं कि विरोधकांकडून होणारे हल्ले आणि निवडणूकीमधील जातीयवादी भूमिका टाळण्यासाठी यावेळी समाजवादी पक्ष तिकिट ठरवताना एम-वाय समीकरणांबाबत सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे.

akhilesh-Mayawati
पंचवीस वर्षानंतर अकाली दल-बसपा पुन्हा एकत्र..

ब्राह्मणांना सोबत घेण्यासाठी बसपाची कसरत

काहीस याच धर्तीवर बहुजन समाजवादी पक्षाने रामाचे दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच मायावतींनी सर्व धर्मांसह अयोध्या, मथुरा आणि काशीच्या विकासाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच बसपने आपल्या दलित राजकारणाची ओळख बदलण्यासाठी आणि ब्राह्मणांना सोबत घेण्यासाठी कसरत सुरू केली आहे. आता राजकीय पक्षांच्या या बदललेल्या युक्त्यांचा त्यांना किती फायदा होईल, हे मिशन २०२२ मधल्या निकालांवरून कळून येईलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com