धक्कादायक : प्रियांका गांधी कैदेत असलेल्या खोलीवर ड्रोनच्या घिरट्या

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रियांका गांधी कैद असलेल्या खोलीच्यावर ड्रोन फिरतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मागील 30 तासांपासून नजरकैदेत आहेत. त्यांना सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यावर एका ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्याचे कॅमेरात कैद झालं आहे. त्यामुळे हे ड्रोन कुणाचं, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रियांका गांधी कैद असलेल्या खोलीच्यावर ड्रोन फिरतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तीस तासांहून अधिक काळ कैदेत असलेल्या प्रियांका गांधींच्या खोलीच्या वर ड्रोन कुणाचं आहे आणि का? याचं उत्तर कोण देणार, असे प्रश्न बघेल यांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रोन गेस्ट हाऊसच्या वर घिरट्या घालताना दिसत आहे.

Priyanka Gandhi
थरारक : शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेला...व्हि़डीओ व्हायरल

कोणताही आदेश अन् एफआयआरशिवाय पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप प्रियांका गांधींनी केला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. 5) उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात आझादीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आलेले पंतप्रधान मोदी लखीमपूर खीरीमध्ये येणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

लखनऊ येथे 'आझादी@75-न्यू अर्बन इंडिया' या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच 75 शहरी विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्यानं लखनऊमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घटनेनंतर काही तासांतच प्रियांका गांधी लखीमपूर खीरीच्या दिशेने निघाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेतले. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जवळपास 29 तासांपासून त्या तिथे आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना अद्याप शेतकऱ्यांना चिरडणारा व्यक्ती अटक का नाही, असा सवाल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com