congress : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाअंतर्गत संघटना पातळीवर मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सचिवांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला आहे. (congress seeks report from secretaries before reshuffle)
सचिवांना सोपवलेल्या विभागाचा, जबाबदारीचा गेल्या सहा महिन्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना द्या, असा आदेश काँग्रेसने शनिवारी काढला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंतच्या कामाचा अहवाल सचिवांकडून मागवला आहे. या अहवालात असमाधानकारक काम असलेल्या सचिवांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सचिव पदावर नियुक्ती झाल्यानंतर राज्यात केलेले संघटनात्मक काम, दिल्लीच्या बैठकींना किती उपस्थिती, सोपवलेली जबाबदारी याचा आढावा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. हा अहवाल कसा द्यायचा, याबाबत नुकतीच बैठक झाली.
बैठकीत हा अहवाल कसा करायचा, याबाबतचे सादरीकरण काँग्रेसकडून करण्यात आले. हा अर्ज भरुन लवकरच तो काँग्रेसच्या मुख्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालावरुन काँग्रेसचे अनेक नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.