Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौभाग्यवती जशोदाबेन मोदी या अहमदाबादहून पुरी येथील जगन्नाथ रथोत्सवाच्या दर्शनासाठी जात असताना शनिवारी त्या जळगावात आल्या होत्या. जशोदाबेन यांनी ओंकारेश्वर मंदिरात पूजेसह अनेक नित्याच्या धार्मिक विधी केल्या.
त्यांनी अभिषेक करीत समुद्र जल, नर्मदा जल, गंगाजलासह पुष्पबेल अर्पण केले. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी अभिषक संकल्प करीत आरती केली. मंदिर संस्थानतर्फे यशोदाबेन मोदी यांचा हार-बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना नारळफळ, प्रसाद देण्यात आला. मंदिरात सुमारे तासभर त्यांच्या हस्ते पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात करण्यात आला.
नित्यनेमानूसार जशोदाबेन यांनी वडाची पूजा केली. त्याला जल अर्पण करून तुळशी वृंदावन कुठे आहे, अशी विचारणा केली. सोबत आणलेले पाणी तुळशीला अर्पण केले. हे विधी झाल्याशिवाय आपण काहीही खातपित नाही, असे त्यांनी पुरोहितांना सांगितले.
ओंकारेश्वर मंदिरातील महादेवाला गंगाजल, समुद्र जल व नर्मदा जलाने भरलेला कलश पुजाऱ्यांना देवून महादेवाला अभिषेक केला. शेवटी शंकराची कापूर आरती त्यांच्या हस्ते झाली.
पंतप्रधान मोदी यांच्या सौभाग्यवती जशोदाबेन मोदी या तीर्थयात्रा करीत आहेत. त्या जळगावमार्गे जात असताना सुमारे दोन तास त्या येथे थांबल्या. त्यांच्यासमवेत बहीण, भाऊ, सेवकांसह दोन सुरक्षारक्षक, पोलिसांचा ताफा होता.
पूजाअर्चा झाल्यानंतर त्या तीर्थक्षेत्र पुरीकडे रवाना झाल्या. दरम्यान, मंदिर संस्थानतर्फे जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. आशिष पांडे, पंडित राघवेंद्र, प्रिन्स पांडे यांनी पौरोहित्य केले. या वेळी गोटू जोशी, अक्षय जोशी, दिलीप जोशी यांच्यासह दर्शनार्थ भाविक उपस्थित होते.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.