Congress Vs BJP : लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; 'या' राज्यात भाजपचा सत्ता उलथवण्याचा प्लॅन

Himachal Pradesh Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 जून रोजी म्हणजे लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात या रिक्त विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
BJP, Congress
BJP, Congress Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : हिमाचल प्रदेश राज्यातील सत्ताधारी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्या सहा आमदारांना अपात्र ठरवले. आता याच सहा आमदारांसह काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, राजीनामा दिलेल्या आमदारांच्या रिक्त जागांवर 1 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यात बंडखोर आमदारांचा भाजपच्या चिन्हावर विजय झाल्यास काँग्रेसला हिमाचल प्रदेशातून पायउतार व्हावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. Congress Vs BJP

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) सहा उमेदवारांनी भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. त्यांना सत्तेतील तीन आमदारांनीही साथ दिली. या बंडखोर आमदारांनी शुक्रवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आशिष शर्मा, होशियार सिंग आणि के.एल. ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी विधानसभा सचिवांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP, Congress
Devendra Fadnavis On Udaynraje : साताऱ्याचा पेच अमित शाह सोडवणार; उदयनराजेंबाबत फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही अपक्षांनी भाजपकडे (BJP) तिकीट मागितले होते, परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. तसेच काँग्रेसने 40 आमदारांसह सरकार स्थापन केल्यानंतर या तीन अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता. आता त्यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

BJP, Congress
Narendra Patil Vs Udayanraje : उदयनराजे तीन दिवस दिल्लीत; इकडे साताऱ्यात पाटलांनी बाजी पलटवली? म्हणाले...

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या आमदारांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) 1 जून रोजी म्हणजे लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात या रिक्त विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यात बंडखोरांचा विजय झाल्यास काँग्रेसला सत्तेतून पायउतार होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस काय काय रणनीती आखणार, याकडे देशाचं लक्ष आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सखू यांनी अपक्ष आमदारांना राजीनामे देऊ नये, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, लोकशाहीत जनतेच्या दिलेल्या कौलाचा आदर करायला हवा होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. तसेच आमदारांवर दबाव होता, असा आरोपही सखू यांनी केला आहे. आता हिमाचल प्रदेशच्या 68 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ 40 वरून 34 वर आले आहे, तर भाजपचे 25 सदस्य आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

BJP, Congress
Dhairyashil Mane News : भाजपच्या बांधणीचा फायदा शिवसेना खासदार मानेंच्या पथ्यावर पडणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com