Narendra Patil Vs Udayanraje : उदयनराजे तीन दिवस दिल्लीत; इकडे साताऱ्यात पाटलांनी बाजी पलटवली? म्हणाले...

Satara Lok Sabha Constituency : भाजपमध्ये पक्षाचा निर्णय अंतिम असतो. आता तो निर्णय कोणाच्याही बाजूने लागेल.
Udayanraje, Narendra Patil
Udayanraje, Narendra PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा लोकसभा (Satara) जागेवरून महायुतीत निर्माण झालेले त्रांगडे सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. येथून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी दबावतंत्राचा वापर केला. त्यानंतर ते तीन दिवसांपासून दिल्लीत आहे, मात्र भाजप नेत्यांनी त्यांना अद्यापही भेट दिली नाही. या काळात माजी आमदार, भाजप नेते नरेंद्र पाटलांनी मात्र संधी साधत आपल्याच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. Narendra Patil Vs Udayanraje

नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले, साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कुणीही निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, त्यावेळी पक्षाच्या आदेशानुसार लढलो. आताही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. कामांमुळे सातारा जिल्ह्यात माझा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे पक्ष मलाच उमेदवारी देईन. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मला न्याय देतील, यावर विश्वास आहे, असे म्हणत नरेंद्र पाटलांनी साताऱ्यावर दावा ठोकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje, Narendra Patil
Harshvardhan Jadhav News : इम्तियाज जलील फेल; तर खैरेंची अवस्था वाईट...: हर्षवर्धन जाधवांनी केली चिरफाड

उदयनराजेंना डिवचलं

साताऱ्यातून उमेदवारी मिळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जोराचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यासाठी ते तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र त्यांना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची भेट मिळत नसल्याची माहिती आहे. यावर नरेंद्र पाटलांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, उदयनराजे हे छत्रपती असून लोकसभेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते तीन दिवस झाले दिल्लीत आहेत. ते छत्रपती असून राज्यसभेचे सदस्यही आहेत. असे असतानाही त्यांना अमित शाह यांची भेट मिळत नसल्याचे समजते, याचे खूप वाईट वाटते, असे म्हणत पाटलांनी उदयनराजेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

सबुरीचा सल्ला

सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपअंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. यावर नरेंद्र पाटलांनी उदयनराजेंना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशात 400 हून अधिक खासदार निवडणूक आणणे गरजेचे आहे. साताऱ्यात मात्र पेच निर्माण झाला आहे. भाजपमध्ये पक्षाचा निर्णय अंतिम असतो. आता तो निर्णय कोणाच्याही बाजूने लागेल. पण राज्यसभेचे सदस्य असलेल्या उदयनराजेंनी आता सबुरीने घेणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Udayanraje, Narendra Patil
Gadchiroli Lok Sabha Election : ‘ते’ तिकडचे राजे, इकडचा राजा मी आहे; कोण म्हणालं असं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com