
Ahilyanagar Pathardi news : पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी इथले शेतकरी बाबासाहेब नामदेव धायतडक (वय 46) यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) याने दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे नमूद केलं आहे.
यासंदर्भात मयताचा मुलगा सचिन धायतडक यांनी पाथर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यात त्यांच्या वडिलांनी एक वर्षांपूर्वी म्हशी घेण्यासाठी शेतकरी (Farmers) बाळासाहेब गर्जे याच्याकडून 10 टक्के व्याज दराने सहा लाख रुपये घेतले होते. त्यापैकी पाच लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले. मात्र तरीही गर्जे यांनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करत धमकी देण्यास सुरूवात केली.
कर्जातील मोठी रक्कम फेडून देखील थेट पाच लाख रुपये देण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी वडिलांचा बाळासाहेब गर्जे अपमान करायचे. तसेच शिवीगाळ करायचे. याशिवाय पैसे दे नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर कर, अशी धमकी देखील द्यायचे. 12 जूनला सकाळी बाळासाहेब गर्जे याचा पुन्हा फोन आला. त्याने पाथर्डी येथील कोरडगाव चौकात येण्याची धमकी दिली, असे पाथर्डी पोलिसांकडे (Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या धमकीमुळे मानसिक तणावात असलेल्या बाबासाहेब धायतडक यांनी आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.मृत्यूपूर्वी त्यांनी गावातील व्यक्तींना व्हॉट्सॲपवर एक चिठ्ठी पाठवत गर्जे याच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे म्हटले आहे.
पाथर्डी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर बाळासाहेब गर्जे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी हे करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.