पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो दावा फोल ठरणार!

काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Narendra Modi & randeep surjewala

Narendra Modi & randeep surjewala

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विरोधातील लढाईमध्ये केंद्र सरकार (Central Government) गाफील राहिले असून ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस दिले जातील हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) दावाही फोल ठरला आहे, असा आरोप काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी आज (ता.26 डिसेंबर) केला. पंतप्रधान मोदींनी काल (ता. २५ डिसेंबर) देशाला उद्देशून दिलेल्या संदेशामध्ये कोरोना योद्धे, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्याची तसेच, १२ ते १८ वर्ष वयोगटातील बालक, युवकांच्या लसीकरणाचीही घोषणा केली होती.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi &amp; randeep surjewala </p></div>
Nana Patole:मी खुर्चीत असतो तर एसटीचे आंदोलन इतके दिवस चाललेच नसते..

सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेवर बोचरी टिका केली आहे. पंतप्रधानांनी काल टिव्हीवर येऊन स्वतःची पाठ थोटपटून घेतली असली तरी, लस कुठे आहे, असा सवाल सुरजेवालांनी उपस्थित केला. तसेच, ओमिक्रॅान विषाणूच्या उपद्रवाकडे सरकार दुर्लक्ष करत असून दिशाहिन नेतृत्व असलेले मोदी सरकार स्टंटबाजीपुरते उरल्याचा जोरदार टोलाही लगावला.

सुरजेवाला म्हणाले की, कोरोनाशी लढाईदरम्यान मोदी सरकारने सातत्याने धोरण बदलले असून स्वतःचा महिमा वाढविणे आणि निवडणूक प्रचार सभांना प्राधान्य देणे, सर्व जबाबदारी राज्यांवर सोपविणे या सारख्या मोदी सरकारच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४० लाख लोकांना प्राण गमवावे लागले होते.आता तिसऱ्या लाटेच्या आधी पुन्हा सरकार लोकांच्या प्राणाशी खेळत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi &amp; randeep surjewala </p></div>
भाजपच्या महापौरांनीच फासली गडकरींच्या आदर्शांना हारताळ!

सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले होते की, ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षावरील सर्व ९४ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस दिले जातील. मात्र, वर्ष संपायला अवघे पाच दिवस शिल्लक असताना सरकारला लसीकरण पूर्ण करण्यात यश आलेले नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

अद्याप १८ वर्षावरील ३६.५ कोटी लोकांना दुसरा डोस मिळालेला नसून देशात कोरोना प्रतिबंधक लसीचे १७.७४ डोस उपलब्ध आहेत. तर ३१ डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी ६० कोटी डोसची गरज आहे. अशाच प्रकारे बुस्टर डोससाठी ३५.७० कोटी डोसची गरज आहे. प्रत्यक्षात उपलब्धता पावणे अठरा कोटीच्या आसपासच आहे, अशी टीका सुरजेवालांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com