भाजपच्या महापौरांनीच फासली गडकरींच्या आदर्शांना हारताळ!

महापालिका आयुक्तांनी त्यानंतर निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश काढले.
Dayashankar Tiwari

Dayashankar Tiwari

sarkarnama

Published on
Updated on

नागपूर : देशात ओमीक्रॉनचे (Omicron) संकट वाढल्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतील सांस्कृतिक खासदार महोत्सव रद्द करण्यात आला. मात्र, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कवी समेंलनात श्रोत्यांची गर्दी दिसून आली. त्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांचा आदर्शही महापौरांनी घेऊ नये, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>Dayashankar Tiwari</p></div>
तुकाराम मुंढेंसह महापालिका येणार अडचणीत? अजित पवारांनी घेतली गंभीर दखल

राज्यात वाढत्या ओमीक्रॉन रुग्णांमुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवीन नियमावली जाहीर केली. महापालिका आयुक्तांनी त्यानंतर निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश काढले. निर्बंधामध्ये सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी केवळ ९ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने आदेश काढताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती शुक्रवारीच आयोजन समितीने दिली. शनिवार, रविवारचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले.

महापौर दयाशंकर तिवारी यांनीही गांधीबाग उद्यानात संमेलनाचे आयोजन केले होते. महापालिका आयुक्तांनी निर्बंध जाहीर केल्यानंतर महापौरांनी काव्य संमेलनाची वेळ रात्री बारापासून नऊपर्यंत कमी केली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. गांधीबाग उद्यानात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत कवी संमेलन पार पडले.

<div class="paragraphs"><p>Dayashankar Tiwari</p></div>
राज्यपालांनी असे उत्तर दिले की महाविकास आघाडीचे नेते चाट पडले...

मात्र, नितीन गडकरी हे खासदार महोत्सव रद्द करतात, तर महापौर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काव्य संमेलन रद्द करू शकत नव्हते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काव्य संमेलन पूर्वनियोजित होते तर खासदार महोत्सवही पूर्वनियोजित होता. गडकरी महापौरांचेही नेते आहे. मात्र, नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी नेत्याकडूनही प्रेरणा घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com