Congress Election Strategy : काँग्रेसची रणनीती ठरली; लोकसभेच्या २० जागा जिंकण्याचे टार्गेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत कोणी पक्षविरोधी कारवाया केल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
Karnataka Congress news
Karnataka Congress newsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३० पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८ पैकी २० जागा जिंकण्याचे टार्गेट काँग्रेस नेत्यांनी ठेवले आहे. त्यासाठीची रणनीती आज (ता. १४ ऑगस्ट) बंगळूरमध्ये ठरली. (Congress target to win 20 Lok Sabha seats in Karnataka)

बंगळूर येथे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांची आज लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी राज्यात वीस जागा जिंकण्याचा निर्धार मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केला.

या बैठकीत मुख्यत्वे लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. राज्यात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कोणते डावपेच आखायचे. कोणती रणनीती ठरवायची, याबाबत प्रदेश काँग्रेस समितीच्या सर्व सदस्यांनी आपले मत नोंदविले. बूथ पातळीवर जाऊन उमेदवार ठरविण्यासाठी जनमत जाणून घेण्याचे या वेळी ठरले.

Karnataka Congress news
Solapur BJP News : सोलापुरात भाजपला धक्का; जिल्हा उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पक्षसंघटना बूथपातळीपर्यंत सक्षम करण्याची सूचना नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच, कोणत्या बूथवर पक्षाला किती मते मिळाली आहेत, हे दिसून येते, त्यावर संबंधित नेत्यांचे पक्षातील स्थान निश्चित होणार आहे, त्यामुळे सर्वांनी प्रत्येक टप्प्यावर सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Karnataka Congress news
Pawar-Mohite Patil Meeting : पवारांच्या भेटीनं ‘आमचं ठरलंय’ला बळ; पण मोहिते पाटील माढ्यात ‘धैर्य’ दाखवतील काय?

लोकसभा निवडणुकीत कोणी पक्षविरोधी कारवाया केल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. पक्षहिताला प्राधान्य देण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. काँग्रेस सरकारकडून राज्यात राबविण्या येत असलेल्या योजना प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. त्यातून जनाधार पक्षाशी कायम राहील, असेही सांगण्यात आले.

Karnataka Congress news
Barshi politics : शरद पवारांचा बारबोलेंना शब्द; ‘बार्शीत तुम्ही लढा, संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी करतो’

दरम्यान, विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या योजनांबाबत अप्रचार केला जात आहे. अन्नभाग्य योजनेचे वर्णन चुकीच्या पद्धतीले करण्यात येत आहे. या अपप्रचाराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोख उत्तर द्यावे, असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com