भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा : राजीनाम्यानंतर म्हणाले, ‘बोलावणे आले तर दिल्लीला....’

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
 Jairam Thakur
Jairam ThakurANI

चंदीगड : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभेच्या निवडणुकीत पराभव दृष्टीक्षेपात दिसताच भाजपचे (BJP) मुख्यमंत्री (Chief Minister) जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resigns) राज्यपालांकडे सुपूर्त केला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच जयराम ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. ‘पक्षश्रेष्ठींकडून बोलावणे आले तरी मी दिल्लीला जाईन,’ असे ठाकूर यांनी म्हटले आहे. (Himachal Pradesh Chief Minister Jairam Thakur resigns as Chief Minister)

 Jairam Thakur
शिक्षिकेची नोकरी सोडून निवडणूक लढवली अन्‌ भाजपच्या बड्या नेत्याचा पराभव केला!

हिमाचल प्रदेश विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ४० जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. सत्ताधारी भाजपला २५ जागांवर समाधान मानावे लगाले. पराभव दिसू लागताच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर ठाकूर म्हणाले की, मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. जनतेच्या विकासाचे काम माझ्याकडून कधीच थांबवणार नाही. आम्हाला विधानसभा निवडणुकीतील पराभावाचे विश्लेषण करावे लागेल. निकालाची दिशा बदलणारे काही मुद्दे होते. श्रेष्ठींकडून बोलावणे आल्यास मी दिल्लीला जाईन, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हिमाचल प्रदेशमध्ये सलग दोन वेळा कुठल्याही एका पक्षाला आजपर्यंत सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी सत्ता बदल होईल, असा अंदाज होता. तो खरा ठरला असून गेल्या वेळी असलेली सत्ता भाजपने गमावली आहे. या ठिकाणी काँग्रेसने ६८ जागांपैकी तब्बल ४० जागा जिंकल्या आहेत. भाजपची गाडी मात्र २५ जागांवरच अडकली आहे.

 Jairam Thakur
शिवरायांच्या अवमानावर बोलणारे अमोल कोल्हेंचा माईक बंद केला : महाराष्ट्रात संतापाची भावना

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा केवळ पराभवच होत नसून अनेक बड्या नेत्यांना पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कायदा मंत्री तथा शहरी विकास मंत्री सुरेश भारद्वाज, वनमंत्री राकेश पठानिया, आरोग्य मंत्री डॉ. राजीव सैजल, शिक्षण मंत्री डॉ. रामलाल मरकांडा, याशिवाय ठाकूर सरकारमधील बडे प्रस्थ तथा कॅबिनेट मंत्री गोविंद ठाकूर हे पाच मंत्री पिछाडीवर आहेत. हे सर्व भाजपचे नेते हिमाचलच्या राजकारणातील दिग्गज नेते मानले जातात. त्यामुळे ते पिछाडीवर राहणे भाजपसाठी धक्कादायक ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com