
BJP Politics : मागीलवर्षी हरियाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. राज्यात भाजपची त्सुनामी आली असून काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना मोठा झटका बसला आहे. नेत्यांचे गड ढासळल्याने काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
हरियाणातील दहा महानगरपालिका आणि 32 नगरपालिकांसाठी काही दिवसांपूर्वी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळपासून सुरू आहे. त्यानुसार दहापैकी नऊ महापालिकांमध्ये भाजपने वर्चस्व राखले आहे. तर एका महापालिकेच्या महापौरपदी अपक्ष महिला विजयी झाली आहे. काँग्रेसला एकही महापालिका मिळालेली नाही.
भाजपने पानिपत, गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, यमुनानगर, हिसार, करनाल, रोहतक आणि सोनिपत या महापालिकांमध्ये विजय मिळवला आहे. मानेसरमध्ये अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला आहे. याशिवाय पाच नगर परिषदा आणि 23 नगरपालिकांमध्ये अद्यापी मतमोजणी सुरू असून अनेकठिकाणी भाजपचाच वरचष्मा दिसून येत आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांचा दबदबा असलेल्या भागांतही काँग्रेसला झटका बसला आहे. आमदार विनेश फोगाट यांचा मतदारसंघ असलेल्या जुलाना नगरपरिषदेतही भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. हुडा यांनी मात्र या पराभवाने काही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे. याआधीही नगरपालिकांमध्ये भाजपचाच दबदबा होता, असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे.
आम्ही एखादे महापौरपद गमावले असेल तर झटका म्हणून शकता. पण या जागा तर आधीपासूनच आमच्याकडे नव्हत्या. काँग्रेसला कुठे ना कुठे फायदा नक्कीच झाला असेल. काही ठिकाणी आमचे एकाचे दोन नगरसेवक झाले असतील. आम्ही निवडणुकीत जोर लावला नव्हता. मीही प्रचाराला गेलो नव्हतो. मी या निवडणुकांमध्ये प्रचारच करत नाही, असे हुडा म्हणाले आहेत.
देशात महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. फरिदाबाद महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रवीण बत्रा जोशी हे तब्बल 3 लाख 16 हजार 852 मतांनी विजयी झाले आहे. याआधी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भाजपच्या उमेदवार सुनीता दयाल यांनी 2 लाख 87 हजार मते मिळवत विक्रम केला होता. हा विक्रम आता मोडित निघाला आहे.
(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.