Sonia Gandhi On Telangana Election: तेलंगणा जिंकण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन'; सोनिया गांधींनी केल्या सहा मोठ्या घोषणा

Congress News: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तेलंगणासाठी सहा मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Sonia Gandhi
Sonia Gandhi Sarkarnama

Telangana News: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी 'इंडिया आघाडी'ची स्थापना करत बैठकांचा धडाका लावला आहे. याबरोबरच काही महिन्यांनी देशातील पाच राज्याच्या विधानसभेच्या देखील निवडणुका आहेत. या पाच राज्याच्या निवडणुकांचीही राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

या पाच राज्यामध्ये तेलंगणाचाही समावेश असून काँग्रेसने तेलंगणा जिंकण्यासाठी 'मास्टर प्लॅन' आखला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तेलंगणासाठी सहा मोठ्या घोषणा केल्या असून तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत, गॅस सिलेंडर ५०० रुपयांना देण्यात येणार, शेतकऱ्यांना वर्षाकाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार, अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत. सोनिया गांधींनी रविवारी हैदराबादमधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी या घोषणा केल्या.

  • सोनिया गांधींनी कोणत्या सहा घोषणा केल्या ?

  • महिलांना महालक्ष्मी योजनेंतर्गत महिन्याला अडीच हजार रुपये देण्यात येतील.

  • महिलांना मोफत बस प्रवास दिला जाईल.

  • शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.

  • शेजमजुरांना १२ हजार रुपये देण्यात येतील.

  • शेतकऱ्यांना धान पिकावर ५०० रुपयांचा बोनसही देण्यात येईल.

  • तसेच सर्व घरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल.

    Edited by - Ganesh Thombare

Sonia Gandhi
INDIA Alliance Meeting : मोठी बातमी ! 'इंडिया आघाडी'त बिघाडी ? भोपाळमध्ये होणारी पहिली जाहीर सभा रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com