MP politics : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची खास रणनीती; मध्य प्रदेशमध्ये 'या' सात नेत्यांवर मोठी जबाबदारी

Madhya Pradesh Assembly Election : काँग्रेस भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी कामाला लागली आहे.
Congress, BJP News
Congress, BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

MP Assembly Election : निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी त्यांच्या सात नेत्यांना मैदानात उतरवले आहे. या नेत्यांच्या माध्यमातून काँग्रेस भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी कामाला लागली आहे.

काँग्रेसची ही जनक्रोश यात्रा 11 हजार 400 किलोमीटरहून अधिक अंतर कापून राज्यातील सर्व 230 विधानसभा मतदारसंघांत पोहोचणार आहे. ही यात्रा 7 वेगवेगळ्या भागात काढली जात जाणार आहे. त्याची कमान कमलनाथ यांनी सात नेत्यांकडे सोपवली आहे. जनक्रोश यात्रेची जबाबदारी बुंदेलखंड-निमारमध्ये अध्यक्ष अरुण यादव, रतलाम-झाबुआमध्ये कांतीलाल भुरिया, विंध्य-रेवामध्ये अजय सिंह, माळव्यात जितू पटवारी, नर्मदांचलमध्ये सुरेश पचौरी, महाकौशलमध्ये कमलेश्वर पटेल आणि गोविंद सिंह यांच्या खांद्यावर ग्वाल्हेर-चंबळची जबाबदारी आहे.

Congress, BJP News
MLA Santosh Bangar Wish : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, विघ्नहर्त्या बाप्पाकडून बांगरांनी घेतला नवसाचा मोदक...

हे सात नेते तिकीट वाटपापासून ते कमलनाथ यांच्या रणनीतीच्या अंमलबजावणीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अशा स्थितीत हे सात नेते भाजपचा (BJP) निवडणूक चक्रव्यूह भेदू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरुण यादव : कमलनाथ यांच्या आधी अरुण यादव मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. यादव यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील सुभाष यादव हे मध्य प्रदेश सहकारी संस्थेचे मोठे नेते होते. दिग्विजय यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीही होते.

सुरेश पचौरी : एकेकाळी काँग्रेसचा (Congress) स्टार चेहरा असलेले सुरेश पचौरी दिग्विजय सिंह यांच्या जवळचे मानले जातात. पचौरी हे मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. युवक काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

Congress, BJP News
Rohit Pawar Future CM News: नगरमध्येही झळकले रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

कांतीलाल भुरिया : मनमोहनसिंग सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे मंत्री कांतीलाल भुरिया हे सध्या मध्य प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. भुरिया यांनी रतलाममधून 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2011 मध्ये काँग्रेसने मध्य प्रदेशची कमान भुरिया यांच्याकडे सोपवली होती.

गोविंद सिंग : मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोविंद सिंग यांच्याकडे ग्वाल्हेर-चंबळची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंग यांच्या आधी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे ग्वाल्हेर-चंबळची कमान होती. विद्यार्थी राजकारणातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे गोविंद सिंह 1990 पासून आमदार आहेत.

अजय सिंह : देशाचे दिग्गज नेते अर्जुन सिंह यांचा वारसा पुढे चालवणारे अजय सिंह विंध्य भागात जनक्रोश यात्रा काढत आहेत. 1985 मध्ये ते पहिल्यांदा चुरहाट मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

कमलेश्वर पटेल : मध्य प्रदेशातील ओबीसी नेते कमलेश्वर पटेल हे कमलनाथ सरकारमध्ये मंत्री होते. पटेल यांना अलीकडेच काँग्रेसची सर्वोच्च संस्था CWC चे सदस्य बनवण्यात आले आहे. पटेल यांच्याकडे विंध्य आणि महाकौशलची जबाबदारी आली आहे.

जितू पटवारी : काँग्रेसचे फायरब्रँड नेते जितू पटवारी जनक्रोश यात्रेत चर्चेत आहेत. पटवारी यांनी यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत 25 विधानसभा जागांना भेटी दिल्या आहेत. माळव्याची कमान त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Congress, BJP News
Rajasthan Politics : खासदार दिया कुमारींशी अमित शाहांची चर्चा : वसुंधरा राजेंसाठी धोक्याची घंटा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com